shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

केज शहरातील मेन रोड वरील पाईप लाईन तात्काळ बदलण्यात यावी या मागणीसाठी भाजपाच्या वतीने निवेदन..!!

बीड । जिल्हा प्रतिनिधी : प्रकाश मुंडे:-

भारतीय जनता पार्टी केज च्या वतीने नगरपंचायत येथे केज शहरात धारूर रोड, कळंब रोड, शिक्षक कॉलनी या भागात मांजरा धरणाचे पाणी जात नसून तेथून घरपट्टी घेतली जाते मग पाणी का दिले जात नाही. तसेच केज शहरात 1992 च्या स्वर्गीय विमलताई मुंदडा  काळात पाईप लाईन झाली ती 28 वर्ष होत आली ती बदली नसून ती वर्षात चारदा फुटणे , पाणी गळती होणे या समस्या येतात. आज जर नवीन पाईप टाकले तर पुन्हा ही समस्या येणार नाही यासाठी आज नगरपंचायत मध्ये निवेदन देण्यात आले. यावेळी भाजपाचे हनुमंत साने सर,महादेव मोरे,शंकरसिंग गोके,विशाल मुंडे,अमर देशमुख,कदम यांनी निवेदन दिले आहे.
close