नेकनूर येथे शिवरामपूरी पतसंस्थेच्या सहाव्या शाखेचा थाटात शुभारंभ...!!
बीड । जिल्हा प्रतिनिधी : प्रकाश मुंडे:- शिवरामपूरी ग्रामीण पतसंस्था सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी काम करणारी संस्था असल्याचे प्रतिपादन बंकटस्वामी मठ संस्थानचे मठाधिपती ह.भ.प.लक्ष्मण महाराज मेंगडे यांनी केले आहे.
केज तालुक्यातील विडा येथे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रम बप्पा मुंडे यांच्या संकल्पनेतून 2003 साली शिवरामपूरी पतसंस्थेच्या पहील्या शाखेची सुरूवात करण्यात आली होती.
त्यानंतर अवघ्या काही कालावधीत पतसंस्थेने ग्राहकांचा विश्वास संपादन करून यशस्वी वाटचाल करत येवता,बरड,वाघेबाभुळगाव,चिंचोली येथे पतसंस्थेच्या शाखा कार्यरत आहेत.आज नेकनुर येथे सहाव्या शाखेचा शुभारंभ ह.भ.प.लक्ष्मण महाराज मेंगडे (बंकटस्वामी मठ संस्थान नेकनुर) ह.भ.प.रतन महाराज सासुरेकर (संत एकनाथ महाराज मठ संस्थान सासुरा) व ह.भ.प.माऊली महाराज बरडकर,ह.भ.प.नाना महाराज कदम यांच्या शुभहस्ते करण्यात आला.प्रसंगी संस्थापक अध्यक्ष विक्रम बप्पा मुंडे,जि.प.सदस्य भारत काळे,जि.प.सदस्य राणा डोईफोडे,जि.प.सदस्य विजयकांत भैय्या मुंडे,नेकनुरचे सरपंच दादाराव काळे,सरपंच श्रीहरी धस, देवगावचे उपसरपंच व युवा नेते आतूल ( दादा) मुंडे, ग्रा.पं.सदस्य अशोक वाघमारे,यांच्यासह परिसरातील सरपंच,उपसरपंच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



