shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गडचिरोली : पुण्यातील भिडे वाडयातील मुलींचा पहिल्या शाळेला राष्ट्रीय स्मारक घोषित करा , माळी समाज संघटनेची मागणी..!!

गडचिरोली ता.९ :- पुण्यातील भिडे वाड्यात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांतीज्योती महात्मा फुले यांनी १ जानेवारी १८४८ साली सुरू केलेल्या मुलीच्या पहिल्या शाळेला राष्ट्रीय स्मारक म्हणून  घोषित करावे, अशी मागणी गडचिरोली जिल्हा माळी समाज संघटनेने केली आहे.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेली मुलीची पहिली शाळा वाचवण्यासाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज अतिरिक्त जिल्हाधिकारी अनंत वालस्कर यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले. मुलगी शिकली तर प्रगती होईल हा विचार मनाशी धरून सावित्रीबाई फुले यांनी आशिया खंडातील मुलींची पहिली शाळा सुरू केली. त्यामुळे आज स्त्रियांना सन्मानाने जगता येत आहे.

परंतु आज शाळेची अतिशय दुरवस्था झाली आहे. शासनाने शाळेचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन, शाळेला सुशोभित करून ती वास्तु राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावी अशी मागणी माळी समाज संघटनेने केली. शिष्टमंडळात माळी समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवराव मोहूर्ले , कोषाध्यक्ष सुखदेव जेंगठे, हरिदास कोटरंगे, अशोक शेंडे, संतोष मोहुरले आदीचा समावेश होता.
close