लोहा। प्रतिनिधी :
लोहा, कंधार विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे यांचा तपासणी अहवाल 25 सप्टेंबर रोजी कोरोना पॉझिटिव आला असून ,आमदार शामसुंदर शिंदे यांच्या सौभाग्यवती यांचाही अहवाल अगोदर कोरोना पॉझिटिव आला होता ,आमदार शामसुंदर शिंदे व त्यांच्या सौभाग्यवती आशाताई शिंदे या कोरोना वर लवकरच विजय मिळवून लोहा, कंधार तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी येवोत व आमदार शामसुंदर शिंदे दांपत्यांना उत्तम आरोग्य लाभण्यासाठी व कोरोनाला हरवण्यासाठी आमदार शिंदे दाम्पत्यांना बळ दे म्हणून आमदार शामसुंदर शिंदे यांचे लोह्यातील कार्यकर्ते शाम पाटील पवार, सिद्धू पाटील वडजे, शुभम पाटील कदम,अशोक सोनकांबळे यांनी रायवाडी येथील सुप्रसिद्ध, प्राचीन जागृत देवस्थान नंदिकेश्वराला अभिषेक करून साकडे घातले आहेत. आमदार शामसुंदर शिंदे दाम्पत्यांच्या उत्तम आरोग्यासाठी लोहा कंधार तालुक्यातील कार्यकर्ते देवाला पूजा-अर्चा अभिषेक करून साकडे घालत आहेत.

