shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जनतेची सेवा करून संघटना मजबूत करू - जिल्हाध्यक्ष रमेश जोशी..!!

शिर्डी प्रतिनिधी :
कु.किरण जाधव
आज दिनांक ०४/०९ /२०२० रोजी अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे गेस्ट हाऊस येथे माहिती आधिकार व पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र चे संस्थापक अध्यक्ष मा अभिजित आपटे सर व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष दिपक कांबळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी कार्यकारिणी ची बैठक पार पडली. सुरवातीला महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख कमलेश शेवाळे यांचा व महाराष्ट्र सरचिटणीस वजीर शेख अहमदनगर जिल्हाध्यक्ष रमेश जोशी उपाध्यक्ष निजाम पटेल बापुसाहेब रोकडे यांचा सत्कार करण्यात आला.

त्यानंतर अनुक्रमे राहुरी तालुकाध्यक्ष शरद रोकङे उपाध्यक्ष भारत झावरे तालुका प्रसिद्धीप्रमुख जावेद शेख तालुका समन्वयक युनुस शेख सचिव सचिव पोपट तरवडे सहसचिव शरद कारंडे कार्याध्यक्ष श्रीकांत नालकर संपर्कप्रमुख बाळासाहेब जाधव संघटक संतोष झावरे आणि जिल्हा सचिव मा कैलास शिंदे ह्या सर्वांना जिल्हाध्यक्ष रमेश जोशी यांच्या हस्ते ओळखपत्र देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र सरचिटणीस वजीर शेख सर अहमदनगर जिल्हाध्यक्ष रमेश जोशी उपाध्यक्ष निजाम पटेल बापुसाहेब रोकडे हे उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख कमलेश शेवाळे यांनी माहिती आधिकार व पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र ची माहिती थोडक्यात सांगितली. व पुढील नियोजन कसे असेल हे समजून सांगितले.हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी उपाध्यक्ष बापुसाहेब रोकडे व राहुरी तालुका कार्यकारिणी यांनी परिश्रम घेतले.
close