shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

केज येथे डॉ. ठोके यांचे आयुर्वेद इम्युनिटी क्लिनिकचे उदघाटन..!!

केज । जिल्हा प्रतिनिधी(प्रकाश मुंडे):- 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनुष्य प्राण्यांची  प्रतिकार शक्ती वाढवून कोरोना विषाणूचा प्रतिकार करण्यासाठी केज येथील प्रसिद्ध वैद्यकीय व्यावसायिक डॉक्टर प्रभाकर ठोके यांनी आयुर्वेद  इम्युनिटी क्लिनिक सुरू केले आहे त्याचे उदघाटन बीड जिल्हा भाजपा वैद्यकीय आघाडीचे जिल्हाअध्यक्ष डॉ. वासुदेव नेहरकर यांचे हस्ते करण्यात आले. 


याबाबतची माहिती अशी की, कोरोना विषाणूचा प्रतिकार करण्यासाठी कोणतीही लस किंवा औषध उपलब्ध नाही. या पार्श्वभूमीवर केज येथील प्रसिद्ध वैद्यकीय व्यावसायिक डॉ. प्रभाकर ठोके आणि त्यांच्या पत्नी डॉ. विशाखा ठोके या दांपत्यानी केज येथे हे आयुर्वेद इम्युनिटी क्लिनिक सुरू केले आहे. त्याचे उदघाटन चा शुभारंभ करीत आहेत. या केंद्राचे उद्घाटन भाजपा वैद्यकीय आघाडीचे जिल्हाअध्यक्ष डॉ. वासुदेव नेहरकर यांच्या शुभ हस्ते व त्याचबरोबर डॉ. उमाकांत मुंडे, डॉ. शेटे, डॉ. ज्ञानेश्वर टोपे, डॉ. मुलांनी, डॉ. वायबसे, डॉ. कुरेशी, सय्यद शरीफ आणि पत्रकार महादेव गायकवाड, नगरसेवक गोपाळ मस्के, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत मस्के, सय्यद शरीफ, पत्रकार गौतम बचुटे, सुभाष सरवदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. कार्यक्रमाचे सूत्र संचलन नंदकुमार मस्के यांनी केले.
close