shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गडचिरोली : ऑक्टोंबर पासून गोंडवाना विद्यापीठाची ऑनलाइन परीक्षा....!!



गडचिरोली ता.१० :- कोरोना संसर्गामुळे रखडलेल्या पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे. लवकरच यासंदर्भातील सविस्तर माहिती व वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे.

 
प्राप्त माहितीनुसार ५ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत ही परीक्षा होणार आहे. उन्हाळी २०२० परीक्षेतील अंतिम वर्षातील , अंतिम सत्राच्या पदवी, पदव्युत्तर वर्गामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थीकरिता परीक्षा घेण्यात येणार आहेत. तसेच अंतिम वर्षातील सत्रातील ज्या विद्यार्थ्यांचे बॅकलॉक विषय असतील अशा परीक्षासुद्धा याच वेळी घेण्यात येणार आहेत. त्यासाठी ५० प्रश्नांची प्रश्नावली लाॅगिन आयडीच्या माध्यमातून परीक्षार्थींना ऑनलाइन मिळेल. परीक्षा बहुपर्यायी स्वरूपाची एकूण ५० गुणांची असणार आहे. प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना आपल्या राहत्या घरातूनच कंप्यूटर व मोबाईलद्वारे सोडविण्यासाठी ७५ मिनिटाचा वेळ मिळणार आहे.

सदर परीक्षेचे प्रात्यक्षिक व पदव्युत्तरचे प्रकल्प ही १५ ते २५ सप्टेंबर या दरम्यान ऑनलाइन घेण्यात येणार आहे. परीक्षेचा निकालही १५ नोव्हेंबरपर्यंत विद्यापीठाने जाहीर करण्याचे नियोजन केले आहे. असे गोंडवाना विद्यापीठाच्या कार्यालयीन परीक्षा व मूल्यमापन मंडळ विभागाच्या परीपत्रातून काल रात्री जाहीर करण्यात आले आहे.
close