shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गडचिरोली : वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार नाल्यात कोसळली; जिवितहानी टळली... !!

अनखोडा जवळ अपघात , नाल्यात १० फुट पाणी 

आष्टी ता.६ :- चंद्रपूर जिल्ह्याच्या नागभीडवरून चामोर्शी मार्गे अहेरीला जात असताना वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अनखोडा गावानजीक नाल्यात कार कोसळली. मात्र सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. फुलझेले कुटुंबीय सुखरूप बचावले.

नागभीड येथील रहिवासी दादाजी कारुजी फुलझेले हे पत्नी शेवंताबाईला घेऊन एमएच-४९ एई २३३८ क्रमांकाच्या कारने अहेरी येथे मुली व जावयाकडे जात होते. फुलझेले हे कार चालवीत होते‌. दरम्यान त्यांना अनखोडा नाल्याजवळ फोन आला‌. फोनवर बोलत असताना त्यांचा वाहनावरील नियंत्रण सुटला व कार थेट नाल्यात कोसळली.

यावेळी नाल्यात दहा फूट पाणी होते. कार चालकाच्या बाजूचा अर्धा काच खुला असल्याने कारचालक फुलझेले हे कार बाहेर पडले व त्यांनी आपल्या पत्नीलाही कार बाहेर काढले.

यानंतर त्यांनी आपल्या पत्नीला नागरिकांच्या मदतीने आष्टी रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच आष्टी पोलिसांनी घटनास्थळ गाठून कार बाहेर काढली.पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक धर्मेंद्र मडावी, पोलीस उपनिरीक्षक जयदीप पाटील व पथक करीत आहे.
close