shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

धनंजय घोळवे यांची भाजपा दिव्यांग विकास आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड..!!



 केज / (प्रकाश मुंडे) तालुका प्रतिनिधी:- भाजपाच्या दिव्यांग आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी माजी मंत्री पंकजाताई मुंडे आणि खा. प्रितमताई मुंडे यांचे विश्वासू सहकारी व दिव्यांग बांधवांसाठी अहो रात्र कार्यशील पत्रकार धनंजय घोळवे यांची दुसऱ्यांदा निवड करण्यात आली आहेत.


या बाबतची माहिती अशी की, केज येथील पत्रकार धनंजय घोळवे हे दिव्यांग बांधवसाठीच्या विविध योजना त्यांच्या पर्यंत पोहोचविणे, दिव्यांग बांधवांची उन्नती व त्यांच्या आर्थिक स्तर उंचावून त्याना स्वावलंबी बनविण्यासाठी बाबत त्यांची तळमळ आणि प्रामाणिकपणा पाहून राज्याच्या माजी मंत्री तथा भाजपच्या नेत्या पंकजाताई मुंडे आणि खा. प्रितमताई मुंडे भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्रजी मस्के यांनी पुन्हा दुसऱ्यांदा पत्रकार धनंजय घोळवे यांना बीड जिल्हा भाजपच्या दिव्यांग विकास आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आहे. भविष्यातही सरकारी योजनेचा लाभ दिव्यांग बांधवांना मिळवून देण्यासाठी प्रसंगी जनआंदोलन करण्याची किंवा संघर्ष करण्याची वेळ आली तरी मागे न हटणारा व मुंडे परिवार आणि पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता अशी धनंजय घोळवे यांची परिसरात ओळख आहे. त्यांच्या या निवडी बद्दल दिव्यांग बांधवांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

"पंकजाताई मुंडे आणि खा. प्रितमताई मुंडे ,भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी माझ्यावर दाखविला विश्वास याच्या माध्यमातून मी दिव्यांग बांधवांची सेवा करणार असून ती माझ्यासाठी सेवेची एक आहे.

- धनंजय घोळवे,
नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष, भाजपा दिव्यांग विकास आघाडी.
close