shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या मृत्युस जबाबदार असणाऱ्या प्रशासनातील अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची नेवासा तालूका पत्रकार एकता संघाची मागणी..!!


सोनई । प्रतिनिधी: मोहन शेगर➤  
सोनई--पुणे येथील टिव्ही ९ चे वरिष्ठ पत्रकार पांडूरंग रायकर यांचा कोरोनामुळे झालेल्या मृत्युस जबाबदार  असणाऱ्या व प्रशासनातील हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन रायकर कुटूबिंयांना त्वरीत शासकिय मदत करण्याची मागणी नेवासा तालूका पञकार एकता संघाच्यावतीने नेवासा तहसिलदार रुपेश कुमार सुराणा यांना एका निवेदनाव्दारे करण्यात आली.



 
यावेळी नेवासा तहसिलदांराना दिलेल्या पञकार संघाच्या निवेदनात म्हटले आहे की, स्व. रायकर यांना वैद्यकिय सेवा व सुविधा वेळेत न मिळाल्यामुळे त्यांचे दुर्देवी निधन झाले.कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रायकर यांची प्रकृती खालावत असतांना त्यांना वेळेत सेवा व सुविधा न मिळाल्यामुळे त्यांचा दुर्देवी अंत झाला याला कारणीभुत असणाऱ्या प्रशासनातील अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन रायकर कुटूंबियांना तातडीने शासकिय मदत देण्याची मागणीही या निवेदनात करण्यात आली.
   
या निवेदनावर नेवासा तालूका एकता पञकार संघाचे अध्यक्ष संदिप गाडेकर,सुनिल गर्जे,राजेंद्र वाघमारे,ज्ञानेश्वर जाधव ,मकरंद देशपांडे,बाळासाहेब नवगिरे, अदिनाथ म्हस्के,अशोक तुवर,पवन गरुड,कमलेश गायकवाड,उमाकांत भोगे आदींच्या सह्या आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकशाहीचा चौथा स्तंभ असणारा पञकार कोरोनाच्या महामारीतही वृत्तसंकलन करण्यासाठी जीवाची पर्वा न करता पुढे जावून जनतेला घरबसल्या माहीती पुरवत असतो.अशा वेळी पञकारच कोरोनाचा शिकार झाले आहेत. सत्य बात्तम्या देत असल्याने प्रशासनातील काही लोकांनी जाणिवपुर्वक रायकर यांना सुविधा दिलेल्या नसल्याची चर्चा आहे याची सखोल चौकशीही महाराष्ट्र शासनाने करुन दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.यावेळी नेवासा तालूका पञकार एकता संघाचे अध्यक्ष संदिप गाडेकर यांनी केली आहे.
close