shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

लोहा न पा चा स्तुत्य उपक्रम नियमांचे पालन करत न पा ने केले 57 गणपतीचे विसर्जन..!!




  प्रतिनिधी । अशोक सोनकांबळे :
 गणपती मंडळाकडून कर्मचाऱ्यांचा सत्कार 
 लोहा तालुका प्रतिनिधी  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणपतीचे सार्वजनिक विसर्जन मिरवणूक काढण्यावर शासनाने बंदी घालून गणेश मंडळाकडून गणपतीची मूर्ती संकलन करून विसर्जन नगरपालिका नगरपंचायती  ग्रामपंचायती  यांनी करावे असे सक्त आदेश दिले होते. 

शासनाच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन लोहा नगरपालिकेने करून नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली शहरातील परवानाधारक  23 आणि विनापरवाना 34 असे 57 गणपती ची मूर्ती संकलित करून नगरपालिका प्रशासनाच्या वतीने श्री चे विसर्जन करण्यात आले मराठवाड्यात शासनाच्या नियमांचे पालन करून गणपतीचे विसर्जन करणारी लोहा नगरपालिका ठरली आहे   शहरातील श्री च्या मुर्त्या संकलित करतांना गणेश मंडळांनी कर्मचाऱ्यांचे स्वागत करून स्वयंफुरतीने गणपती मूर्ती कर्मचाऱ्याकडे स्वाधीन केल्या शहरातील इतिहासात प्रथमच विना पोलीस बंदोबस्त आणि न पा प्रशासनाच्या वतीने विसर्जन करण्यात आले.

    कोरोनाचा प्रारदुर्भाव वाढू नये गर्दी होऊ नये म्हणून शासनाने पोळा गणपती मोहरम  आदी सण उत्सव हे अगदी साद्या पद्धतीने साजरे करावेत मिरवणुका काढण्यात येऊ नयेत असे आदेश दिले होते गणपती उत्सव हा फार महत्वाचा असून या काळात मिरवणूक काढण्यात येऊ नये म्हणून पोलीस निरीक्षक भागवत जायभाये नगराध्यक्ष   गजानन सूर्यवंशी यांनी दोन बैठका घेऊन कमीत कमी गणपती ची स्थापना करावी सार्वजनिक ठिकाणी गणपतीची स्थापना करू नये घरातच श्री ची पूजा करावी शासनाच्या नियमांचे पालन करावे   विसर्जनाच्या दिवशी ठरवून दिलेल्या वेळे प्रमाणे गणेश मंडळांनी जाग्यावरच श्री ची पूजा  आरती करून  श्री ची मूर्ती ही न पा प्रशासनाकडे सुपूर्द करावी असे आवाहन नगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले होते .

या आवाहनाला गणेश मंडळांनी सहकार्य केले विसर्जनाच्या दिवशी न पा प्रशासनाच्या वतीने शहरातील गणपती ची मूर्ती संकलित करण्यासाठी पाच ट्रकटर व पंचवीस कर्मचारी कर्तव्यावर लावण्यात आले होते  या कर्मचाऱ्यांनी गली वार्डात जाऊन 57 श्री च्या मूर्ती संकलित करून घेतल्या आणि नियोजि विसर्जनाच्या ठिकाणी सुनेगाव तलावात विसर्जन करण्यात आले त्या ठिकाणी न पा प्रशासनाने पूजेसाठी ब्राह्मण यांच्या हस्ते पूजा करण्यात आली मूर्ती पाण्यात विसर्जन करण्यासाठी ठराविक असलेले भोई समाज बांधव उपस्थित होते विरजण स्थळी वीज पुरवठा करण्यात आला होत.

 विसर्जनाच्या वेळी विना पोलीस बंदोबस्त  विसर्जन शांततेत करण्यात आले गणेश मंडळांनी कर्मचाऱ्यांचे पुष्पहार देऊन स्वागत केले शासनाच्या नियमांचे पालन करण्यासाठी नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी उपनगराध्यक्ष शरद पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुख्याधिकारी अशोक मोकले कक्षअधीकारी उल्हास राठोड माधव पवार पारेकर  गोविद काळे बाबाराव चव्हाण इंजिनीअर चवडेकर  आदी नी परिश्रम घेतले लोहा नपा ने शासनाच्या नियमांचे पालन करून 57 श्री चे विसर्जन करून मराठवाड्यात स्तुत्य उपक्रम राबविले आहे.
close