सोनई । प्रतिनिधी: मोहन शेगर➤
सोनई गावातील सरकारमान्य देशी दारुचे दुकाअन फोडून सुमारे ५१,७५० रुपयांची देशी दारु चोरी प्रकरणातील आरोपी सोनई पोलीसांनी मोठ्या शिताफिने तपास करुन यातील दोन आरोपीना अटक केली आहे.
या बाबत पोलीस सुत्रांकडून समजलेली अधिक माहिती अशी की, सोनई येथील नवी पेठेतील व्यंकटेश रामस्वामी पालेपवार यांचे सरकारमान्य देशी दारुचे दुकान आहे लॉक डाऊन च्या काळात हे दुकान पुर्णपणे बंद असताना दि.१२/०९ ते १४/०९ दरम्यान हे दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी देशी दारुचे २३ बॉक्सची चोरी झाल्याची फिर्याद सोनई पोलीस ठाण्यात दाखल होती सोनई पोलीसांनी गोपनीय माहितीच्या आधारे कौशल्याने तपास करुन काही तासातच यातील आरोपी अजय राजेंद्र शिंदे वय २१ रा.सोनई व हरि विलास साळूंके वय १८ रा.सोनई यांना अटक केली आरोपीने आणखी एका घरफोडीची कबुली दिलीआहे पूढील तपास सोनई पोलीस ठाण्याचे स.पो.नि जनार्धन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सोनई पोलीस अधिक तपास करत आहेत.


