shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महिला तक्रारीतील आरोपी कडून फिर्यादीस जीवे मारण्याची धमकी..!!


सोनई । प्रतिनिधी: मोहन शेगर➤ 
 सोनई पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या महिला आत्याचार गुन्ह्यातील आरोपी विजय मेघराज खंडागळे व संजय मेघराज खंडागळे या आरोपीने यातील फिर्यादी मुलगी हिस दि.१४/०९/२०२० रोजी सोनई शनिशिंगणापूर रोड जगदंबा मंदीराजवळ फिरत असताना मारण्याची धमकी देऊन फिर्याद मागे घेण्यासाठी दबाव टाकत आहे.





 सायबर गुन्हा असल्याने तो तपास पोलिस निरिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आहे. तो शनिशिंगणापूर पोलिसस्टेशनचे निरिक्षक विलास भोये यांच्याकडे गेला आहे. या बाबत त्यांना संपर्क केला असता ते म्हणाले सायबर गुन्ह्याचा तपास मी करणार आहे. पण आरोपी ज्या पोलिस स्टेशन अंतर्गत येतात त्या सोनई पोलिस स्टेशन ने त्यांना अटक करावी असे बोलताना ते म्हणाले.

या बाबद समजलेली अधिक माहिती अशी की, सोनई येथील हलवाई गल्ली येथील फिर्यादी मुलीवर अत्याचार केल्याबद्दल सोनई पोलीस ठाण्यात ३७६/२,१, ३५४,३६३,३६६९ अ, ५०६ बाललैंगीग अत्याचार कलम अधिनियम २०१२ कलम ४,६,८,१२,१७ व अन्वये गुन्हादाखल झालेला आसून यातील आरोपी ऋषीकेश विजय खंडागळे, केशन मनोहर सुद्रिक, संकेत संजय थोरात, विजय मेघराज खंडागळे व संजय मेघराज खंडागळे यांना गुन्हा दाखल झाल्यापासून आजपर्यंत सोनई पोलीस यांना सापडू शकले नाही हे न उलगडणारे कोडेच आहे. यातील आरोपी हा फिर्यादी मुलीला व तीच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देत असून फिर्यादी मुलगी प्रचंड दबावाखाली आहे. तीच्याकडून काही अनुचीत प्रकार घडला तर याला जबाबदार कोण अशी प्रतिक्रीया मुलीच्या घरच्या लोकांकडून व्यक्त होत आहे. या गुन्ह्यातील आरोपी मोकाट फिरत असून फिर्यादीस धमकावीतअसताना सोनई पोलीस आरोपीला अभय का देत आहेत असा प्रश्न सर्वसामान्य सोनईकरांना पडलाआहे. फिर्यादी सोनई पोलीस ठाण्यालाया बाबद माहिती देण्यासाठी गेली असता हा तपास शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात वर्ग झाला आहे तेथे गेले असता सोनई पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हा घदला असल्याने त्यांच्याकडे तपास आहे अशी टोलवाटोलवीचे उत्तरे दिली जात असल्याने फिर्यादीचे कुटुंब प्रचंड तनावात आहेत. या बाबत सोनई पोलीस ठाण्यात नुतन धर्मेंद्र सोनवणे हीने तक्रार दाखल केली असून सोनई पोलीसांनी भा.द.वि.कलम ५०४, ५०६ अदाखल पात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.


तरी या संदर्भात पोलिस तपासात प्रगती नसुन आठ दिवसापासुन आरोपी मोकाट गावात फिरत असताना सोनई पोलिस शनिशिंगणापूर पोलिस या बाबत अनभिज्ञ आहेत.

close