हिंगोली । प्रतिनीधी
परतीच्या पावसाने खरिपातील नगदी पीक म्हंजे सोयाबीन आणि ते आत्ता या अतिवृष्टीमुळे व सतत च्या पावसाने खराब जाले.
सेनगाव तालुक्यातील भानखेडा येथील शेतकऱ्यांनी दहा एकर सोयाबीन वर रोटावेटर फिरवला आहे भानखेडा येथील ज्ञानबा कोटकर असे या शेतकऱ्यांचे नाव आहे कोटकर यांच्याकडे दहा एकर शेती आहे त्यांनी सोयाबीनची पेरणी केली सुरवातीस चांगला पाऊस पडला असल्याने सोयाबीन पिकांची वाढ चांगली जाली होती मात्र शेंगा भरल्या नाहीत आणि आत्ता परतीच्या पावसाने काढण्यासाठी आलेल्या सोयाबीन पावसामुळे पूर्ण पणे भिजले आहे एकरी सोयाबीन ला एक पोते उतार येत असल्याने काढणी साठीचा खर्च देखिल वसुल होत नसल्याने कोटकर यांनी आपल्या दहा एकर मधील सोयाबीन वर रोटवेटर फिरवला आहे एका एकर मधील सोयाबीन कापनी साठी २५०० ते ३००० हजार रुपये द्यावे लागत आहेत आणि मळणीयंत्रणातून काढणी करणासाठी एका एकर मधील २००० हजार रुपये द्यावे लागत आहे आणि आणि एका एकर मधील उत्पन्न होत आहे एक पोते त्यामुळे सोयाबीन कापनी आणि मळणीयंत्रातून काढणीचा खर्च देखिल निघत नाही आणि सुरवाती पासून लागवड केलेला खर्च तर सोडूनच द्या अशी परिस्थिती सध्या हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आहे.
हिंगोली जिल्ह्यांमध्ये पालकमंत्री वर्षा गायकवाड व कृषी मंत्री विरोधी पक्षाचे नेते यांनी देखिल नुकसान जालेल्य पिकांची पाहणी केली मात्र यांच्या पाहणी नंतरहि नुकसानीचे पंचनामे करण्यात आले नाहीत त्यामुळे आता प्रशासनाकडून काही नुकसानभरपाई मिळेल का नाही या भागातील शेतकऱ्यांना सोयाबीन शिवाय दुसरे कोणतेही पीक नाही वर्ष भर जगायचे कसे हा प्रश्न शेतकरी वर्गाला पडला आहे आत्ता सर्व शेतकऱ्यांची आशा प्रशासनाच्या वतीने काय नुकसानभरपाई मिळते याकडे सर्वच शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

