shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आमदार शामसुंदर शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे लोहा येथे नाफेडच्या हमीभाव खरेदी केंद्रास मंजुरी..!!

लोहा (प्रतिनिधी) : लोहा, कंधार विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या तळमळीच्या पाठपुराव्याला यश आले असून लोहा येथे नाफेड अंतर्गत सन 2020- 21 वर्षाकरिता मूग, उडीद, व सोयाबीन, तुर, हरभरा हमीभाव खरेदी केंद्र मंजूर झाल्यामुळे लोहा तालुक्यातील शेतकऱ्यांचा शेतीमाल या हमीभाव खरेदी केंद्रांमध्ये हमी भावात खरेदी होणार असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांना या खरेदी केंद्राचा मोठा लाभ मिळणार आहे .

आमदार शामसुंदर शिंदे हे शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नाची सोडवणूक तत्परतेने करत असल्याचे  लोहा कंधार विधानसभा मतदारसंघांमध्ये वेळोवेळी दिसून येत असून या अगोदर कंधार कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत नाफेडचे हमीभाव खरेदी केंद्र ही आमदार शामसुंदर शिंदे यांच्या प्रयत्नामुळे सुरू झाल्याने कंधार तालुक्यातील शेतकऱ्यांना या हमीभाव खरेदी केंद्राचा मोठा लाभ होत असल्याने कंधार येथील नाफेडच्या हमीभाव खरेदी केंद्राच्या मंजूरी नंतर लगेचच लोहा येथे लोहा तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघास नाफेडच्या हमीभाव मूग, उडीद ,सोयाबीन व तूर हरभरा खरेदी केंद्र कर्तव्यदक्ष आमदार शामसुंदर शिंदे यांच्या प्रयत्नामुळे मंजूर झाल्याने लोहा तालुक्यातील शेतकऱ्यांना या नाफेडच्या हमीभाव खरेदी केंद्राचा मोठा लाभ होणार असल्याचे आमदार शामसुंदर शिंदे यांनी बोलताना सांगितले.

सन 2020 -21 वर्षांमधील लोहा तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघास नाफेडच्या हमी भाव सोयाबीन ,तूर ,हरभरा, मूग, उडीद खरेदी केंद्रास शासनाने मंजूरी दिल्याचे शासनाचे पत्र 2020- 21 /286 दिनांक 07/10 2020 च्या पत्राने कळविले आहे. नाफेडचे हमीभाव खरेदी केंद्र लोहा येथे मंजूर झाल्यामुळे लोहा तालुक्यातील शेतकऱ्यांमधून आनंद व्यक्त होत असून आमदार शामसुंदर शिंदे यांचे तालुक्यातील शेतकरी वर्गातून अभिनंदन व कौतुक होत आहे.
close