shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

संगमनेर: निमगाव खुर्द येथील विवाहितेचा गळफास घेऊन आत्महत्या सासरा आणि नवऱ्याला अटक...!!

संगमनेर : तालुक्यातील निमगाव खुर्द  विवाहिता, पुनम अमोल कासार, वय 23, या महिलेने सासरच्या धाकाला कंटाळून झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
या प्रकरणी सासरा, सासू, नवरा, या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला तरी या प्रकरणी विवाहितेचा नवरा आणि सासरा यांना याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतले. निमगाव खुर्द येथील अमोल आबासाहेब कासार ,यांच्याशी पुनम अमोल कासार हिचा डिसेंबर, २०१९ मध्ये लग्न झालं. त्यानंतर सतत तिला शुल्लक कारणांवरून सासरच्या मंडळीकडून तिला मारहाण व्हायची आणि पैसे मागण्याची तक्रार विवाहितेचा भाऊ, सौरभ विलास हसे, यांने पोलिसांना दिली आहे. 


सौरभ विलास हसे यांनी सांगितले की पूनमला कायम शूल्लक कारणांवरून तिचा  छळ केला जात असे. कधी मानसिक तर कधी शारीरिक छळ केला जायचं यामध्ये सौरभ हसे यांनी सांगितले की आम्हाला फोन आला व त्यांनी सांगितले की तुमच्या मुलीने गळफास घेतला आहे. पण आम्ही जायचे तोपर्यंत त्यांनी तिथे काहीच ठेवले नव्हते. ज्या झाडाला गळफास घेतला त्या झाडाला दोरी ही नव्हती व मयत सुद्धा ॲम्बुलन्स मध्ये होते. तरी ही आत्महत्या नसून पैशासाठी खून केला आहे.

असे विवाहितेचा भाऊ सौरभ हसे यांनी सांगितले. मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून पूनमने आपली जीवन यात्रा संपवून टाकली . तिच्या मृत्यूच्या वेळी ती ५ महिन्याची गर्भवती होती. मृत्यूला जबाबदार असणाऱ्या सासू, सासरा, नवरा यांच्यावर कठोर कारवाई करावी.अशी मागणी विवाहितेच्या भावाने केली आहे. यापुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील पाटील करत आहेत.
close