shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

किंग्ज इलेव्हन पंजाब बाद फेरी गाठेल ?


किंग्ज इलेव्हन पंजाब संघाची तेराव्या आयपीएल सत्रातील कामगिरी प्रत्येकाला कोडयात टाकणारी अशीच राहीली आहे. स्पर्धेच्या सुरूवातीच्या सत्रात दणकेबाज प्रारंभानंतर त्यांची गाडी रुळावरून घसरली होती. परंतु उत्तरार्धात मुंबई इंडियन्स विरुद्ध खेळलेल्या दोन सुपर ओव्हरनंतरच्या विजयामुळे त्यांचा आत्मविश्वास दुणावला आणि त्यानंतर त्यांनी मागे पुढे न बघता एकामागून एक विजयांचा सपाटा लावत प्ले ऑफ फेरी कडे कूच केली आहे. राहीलेल्या दोन सामन्यात जर त्यांना विजय मिळाला तर त्यांना अंतिम चार संघात प्रवेश करणे सुलभ जाईल. सध्याची त्यांच्या संपूर्ण संघाची देहबोली व कामगिरी बघता ती कामगीरी ते करतील अशी आशा वाटत आहे.

एक वेळ अशी होती की, पंजाब च्या संघाची फलंदाजीची संपूर्ण मदार सलामीवीर कर्णधार केएल राहुल व मयंक अग्रवालवरच अवलंबून होती. परंतु आता मयंक जखमी असल्याने अंतिम संघात नाही, तरी त्याच्या जागेवर आलेला मनदिप सिंग वडिलांच्या आकस्मिक मृत्यूनंतरही सामना जिंकून देणारा खेळ करून गेला. तर अनुभवी ख्रिस गेल, निकोलस पुरनही आपली जबाबदारी सांभाळून खेळ करतात. शिवाय कर्णधार राहुल स्पर्धेत सर्वाधिक धावा बनवून ऑरेंज कॅप बाळगून आहे. शिवाय गोलंदाजीत अनुभवी मोहम्मद शमी, नवखा अर्शदिप, रवी बिश्नोई, मुरुगन आश्विन जोरदार करामत करत असून १०.७५ कोटी रूपये मानधन घेतलेला ग्लेन मॅक्सवेल आता कुठे चमक दाखवू लागला आहे.

सोमवारी रात्री शारजाच्या छोटेखानी मैदानावर पंजाबव कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात एक चुरशीची लढत झाली. त्यात पंजाबने केकेआरचा अवघ्या सात धावांनी फडशा पाडताना आपला सलग पाचवा विजय मिळविल्याने त्यांची बाद फेरी गाठण्याची शक्यता वाढली आहे. या सामन्यात पंजाबच्या विजयाचे शिल्पकार ठरलेल्या खेळाडूंच्या कामगिरीवर आपण एकदृष्टीक्षेप टाकूया.

आपल्या धारदार गोलंदाजीत सातत्य राखत वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने या सामन्यात केकेआरच्या फलंदाजीचा कणाच कापून टाकताना शुभमन गिल, राहुल त्रिपाठी व दिनेश कार्तिक यांना बाद करून केकेआरला मागच्या पायावर ढकलले..आक्रमक फलंदाजीसाठी ख्याती प्राप्त फलंदाज ख्रिस गेलने या सत्रातील स्वतःचे दुसरे अर्धशतक ठोकताना केवळ २९ चेंडूत पाच षटकार व दोन षटकार मारताना ५१ धावा कुटल्या. त्यामुळे पंजाबचा विजय सुकर झाला.

सलामीवीर मयंक अग्रवालच्या अनुपस्थितीत संधी मिळालेल्या मनदिप सिंगने नाबाद ६६ धावांची खेळी साकारली. ५६ चेंडूत आठ व २ षटकार ठोकणाऱ्या मनदिपने कर्णधार राहुलसह ४७ धावांची मजबूत सलामी देत सामना जिंकूनच परतला.नवोदित व तरणाबांड फिरकी गोलंदाज रवी बिश्नोईने आपल्या चार षटकात २० धावा देऊन केकेआरचा कर्णधार ओएन मॉर्गन व पॅट कमिन्सला बाद करून आपली वेगळीच छाप सोडली.

इंग्लिश जलदगती गोलंदाज ख्रिस जॉर्डननेही प्रभावशाली मारा करताना आपल्या चार षटकात २५ धावा देऊन सुनिल नारायण व वरूण चक्रवर्ती यांना बाद केले.

लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close