संगमनेर । प्रतिनिधी:
संगमनेर न्यायालयात आज पुन्हा एकदा दिनांक २८-१०-२० बुधवार या दिवशी प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या वादग्रस्त वक्तव्य वरील सुनावणी होणार आहे.
आजच्या सुनावणी कडे सबंध राज्याचे लक्ष लागल्याचे आपल्याला दिसते आहे. इंदुरीकर महाराजांनी एक वक्तव्य केले होते. त्यांचे वक्तव्य पुत्र प्राप्ति बाबत होते. ह्या वक्तव्यानंतर काही सामाजिक व्यक्तिंनी त्यांचेवर गुन्हा दाखल केला आहे व आता पुन्हा एकदा संगमनेर न्यायालयात त्याची सुनावणी होणार.(एडवोकेट , रंजना गवांदे) यांनी याचा पाठपुरावा केला होता.
इंदुरीकर महाराजांचे वकील खेडी धुमाळ ,हे आज या सुनावणीला हजर राहणार आहे. व आजच्या सुनावणीत नक्की काय होतंय याच्याकडे संबंध राज्याचे लक्ष आहे व नक्की महाराजांनी केलेले वक्तव्य बरोबर आहे की चूक हे आपल्याला आजच्या सुनावणीत कळेल..!

