shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

देवकाते वस्ती नजीक धोकादायक वळणावर अपघात... स्थानिक युवकांच्या तत्परतेमुळे वाचला जीव...!!

इंदापूर । प्रतिनिधी (तात्याराम पवार)
"देव तारी त्याला कोण मारी"
भिगवन: २८ ऑक्टोबर २०२०. दि.२६ रोजी सोमवारी संध्याकाळी 9 वाजता बारामती वरून भिगवन कडे येत असताना चार चाकी वाहन देवकाते वस्ती घाटात वळणार चालक सोनटक्के रा. जंक्शन अपघाती वळणार  थेट रस्त्याच्या कडेला असणाऱ्या पाईपवर जाऊन  आदळले हा अपघात पाहिल्यानंतर स्थानिक युवकांना या अपघाताची तीव्रता पाहून चालक सोनटक्के वाचतील याची त्यांना शंकाच होती परंतु म्हणतात ना देव तारी त्याला कोण मारी या नुसार चालक सोनटक्के यांना किरकोळ लागल्याने त्यांना तात्काळ स्थानिक युवकांनी कार्य तत्परतेने सचिन खडके ,सुंदर कुसाळकर ,सचिन मलगुंडे ,कपिल लांडगे, राहुल कदम ,भारत कदम, नागनाथ गायकवाड यांनी पोलिसांशी संपर्क करून सोनटक्के यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले व त्यांच्यावर उपचार करून वाहन बाहेर काढले. या अपघातावेळी मदत कार्याच्या ठिकाणी अक्षरशा अंडर पॅन्ट बन्यान वर युवकांनी मदत केली असल्याचे दिसले यावेळी पोलीस कर्मचारी (मेजर )शंकर निंबाळकर, अक्षय वाबळे व तेथील स्थानिक युवकांनी दाखवलेल्या तत्परतेने सोनटक्के यांचा जीव वाचला.

अंधारात अपघातातून  चालकाला बाहेर काढताना पोलीस कर्मचारी व सामाजिक कार्यकर्ते सुंदर कुसाळकर


भिगवण-बारामती रस्त्यावर निधी मंजूर करून देखील अपघाती वळण नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे .लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने यांनी तातडीने वळणे आणि रस्त्याचे काम सुरू करावे .नाहीतर असे अपघात होत राहतील. असे नागरिकांमध्ये चर्चा आहे. स्थानिक युवक व पोलीस कर्मचारी यांनी एवढ्या रात्री मध्ये दाखवल्या गेलेल्या माणुसकीच्या नात्याने केलेले कार्य हे तेथील नागरिकांच्या चर्चा व कौतुकाचा विषय ठरत असल्याचे दिसत आहे अशी माहिती बिगवन येथील सामाजिक कार्यकर्ते सुंदर कुसाळकर यांनी दिली
close