प्रतिनिधी । मोहन शेगर :
सोनई:- तामसवाडी येथे कृषीतज्ञ डॉ. दिलीप उदाशी यांचे कांदा,गहू,हरभरा,या पिकावर शेतकरी चर्चा सत्र दोबोले वस्तीवर संपन्न झाले. या चर्चासत्रात औरंगाबाद जिल्ह्यातील व अ.नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सहभाग घेतला .कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे सर्वांनी सोशल डिस्टन्स , सॅनिटायझर ,मास्कचा वापर करीत शासन नियम पाळण्यात आला डॉ.उदाशी यांनी विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्ये अनेक शेतकरी कृषी तंत्राचा वापर करून विक्रमी उत्पादन घेत आहेत असे सांगण्यात आले.
डॉ.उदाशी यांनी कांदा पिकावरील महत्त्वाच्या उत्पन्न वाढीच्या सर्व शेतकऱ्यांना समजावून सांगितल्या आणि त्या तंत्राचा योग्य वापर केल्यास एकरी 35 टन कांदा निघू शकतो असे सांगितलं .उदाशी स्वखर्चाने गावोगावी सतत दौरे करीत आहेत चर्चासत्र आयोजित केले जात आहेत व शेतकऱ्यांना जागृत करीत आहेत. शेतकरी सुखी झाला पाहिजे तो कर्ज मुक्त व्हावा या उद्देशाने ते काम करीत असल्याचे खरवंडी येथील कृषी पदवीधर व प्रगत शेतकरी बाबासाहेब भोगे पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले.
यावेळी खरवंडी चे माजी सरपंच शिवाजी अण्णा फाटके मुळा कारखान्याचे संचालक श्री बाबासाहेब जगताप पंकज अटल व रविभाऊ कळसकर श्री प्रकाश दो बोले घोडेगाव हे हजर होते व असंख्य शेतकरी मंडळींनी चर्चा सभा चा लाभ घेतला
सोनई- तामसवाडी कृषी चर्चा सत्रात कृषी तज्ञ डाॅ ऊदासी यांना सन्मानित करताना मा. सरपंच शिवाजी अण्णा फाटके व संयोजक बाबासाहेब भोगे.

