इंदापूर : प्रतिनिधी
जनसामान्यांचे नेतृत्व असलेले निरा-भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन हर्षवर्धन पाटील यांनी आज दि.२८ रोजी इंदापूर तालुक्यातील भिगवण स्टेशन (सोनटक्के वस्ती) येथील संतोष माणिकराव सोनटक्के यांच्या वडिलांचे वृद्धापकाळाने निधन झाल्याचे समजले. त्यांच्या अंत्यविधीकरता राजवर्धन पाटील हे खडतररित्या प्रवास करुन सोनटक्के कुटुंबियांच्या दुःखात सामील झाले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, इंदापूर तालुक्यातील भिगवण स्टेशन येथील सोनटक्के वस्तीवरील दादांचे कार्यकर्ते असलेले संतोष सोनटक्के यांचे वडील माणिकराव सोनटक्के (वय ७० वर्षे) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या अंत्यविधीच्या क्रियेकरता जाण्यासाठी संचालक राजवर्धन पाटील हे गेले असताना वाटेत अंत्यविधीच्या ठिकाणापासून अलीकडे ओढ्याला मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत होते.या ओढ्यावरुन कोणतेही दुचाकी अथवा चार चाकी वाहन तेथून घेऊन जाणे शक्य नव्हते.
अश्या परिस्थितीमध्ये त्यांनी सतत वाहणाऱ्या पाण्यातून, ट्रॅक्टरची पुढची चाके अर्ध्याच्या वरती पाण्याखाली जात असतानाही त्यांनी हा खडतर प्रवास करुन इच्छा तेथे मार्ग या उक्तीप्रमाणे आपल्या कार्यकर्त्याच्या कुटुंबावर कोसळलेल्या दुःखाच्या क्षणी धावत जात कुटुंबीयांचे सांत्वन केले.
यावेळी भिगवणचे युवा कार्यकर्ते व मार्केट कमिटीची माजी उपसभापती पराग जाधव उपस्थित होते.

