वडापुरी: (ता. इंदापूर जि.पुणे)
गावचे सुपुत्र, तत्वनिष्ठ, निस्वार्थी,अभ्यासू, दिलदार. शिव, फुले, शाहू,आंबेडकर चळवळीचे अभ्यासक, बहुजन महापुरुषांच्या विचारांशी एकनिष्ठ. वडापुरी गावच्या सामाजिक,शैक्षणिक,सांस्कृतिक कार्यात नेहमी अग्रभागी असणारे, शेतीची आवड जपत आधुनिक पद्धतीने शेती करण्यावर भर देणारे, इंदापूर येथील
मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टचे ज्येष्ठ संचालक, आदर्शवत सेवानिवृत्त मुख्याध्यापक मा. दिनकर ज्ञानदेव चंदनशिवे ( गुरुजी) यांचे दि.२७/१०/२०२० रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे.
ते आपल्या कुटुंबातील एक सदस्य होते. गुरुजींच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. गुरुजींचे विचार सदैव आमच्या स्मरणात राहतील.
शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी, संचालक मंडळ, मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट इंदापूर यांनीही भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. आज दिनांक २८/१०/२०२० रोजी निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनी कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले व भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली यावेळी याठिकाणी त्यांच्या कुटुंबातील मुले विशाल चंदनशिवे ,पंकज चंदनशिवे बडोदा बँक इंदापूर शाखा मॅनेजर यांच्याबरोबर विचारपूस केली यावेळी गावातील रेवनाथ नलवडे, साहेबराव चंदनशिवे माजी ग्रामपंचायत सदस्य वडापुरी हे उपस्थित होते

