shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आमदार शामसुंदर शिंदे दांपत्याने कोरोनावर विजय मिळवल्याने विक्रांत पाटील शिंदे यांच्या हस्ते अनाथाश्रमातील मुलांना खाऊचे वाटप ..!!

लोहा । अशोक सोनकांबळे :

लोहा ,कंधार विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आमदार शामसुंदर शिंदे व त्यांच्या सुविद्य पत्नी सामाजिक कार्यकर्त्या सौभाग्यवती आशाताई शामसुंदर शिंदे यांना गेल्या दोन आठवड्यांपूर्वी कोरोना या गंभीर आजाराची बाधा झाली होती, आमदार शामसुंदर शिंदे दाम्पत्यानि  मुंबई येथील रुग्णालयात कोरोनावर उपचार घेतले होते. 

गेल्या आठवड्यात आमदार  शिंदे दांपत्य मुंबईस्थित त्यांच्या निवासस्थानी सुखरूप परतले असल्याने विक्ररांत दादा शिंदे मित्र मंडळ अनतेश्वर च्या वतीने व युवा नेते विक्रांत पाटील शिंदे यांच्या उपस्थितीत पुणे येथील लहान मुलांच्या अनाथ आश्रमाला भेट देऊन आश्रमातील लहान मुलांना खाऊ वाटप केले ,यावेळी अनाथाश्रमातील मुलांसोबत विक्रांत पाटील शिंदे यांनी मनसोक्त गप्पा मारून त्यांच्या  अडचणी जाणून घेतल्या, यावेळी विक्रांत शिंदे यांच्यासह माऊली पाटील जोगदंड, शंकर बोरुळे, गोपीनाथ गायकर सह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
close