shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सम्राट अशोकांचा वारसा पुढे नेणारे डॉ.अशोक शीलवंत यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन...!!





येवल्यातील शिलालेखात अशोक शिलावंतच्या 
अस्थिस्थापन..

शिर्डी एक्सप्रेस:
नाशिक विभाग प्रतिनिध:
ता.24-10-2020
संजय गांगुर्डे
अशोक सर्वांगीन सोसायटी (पुणे) संस्थापक अध्यक्ष डॉ. अशोक शीलवंत (वय५९) यांचे ह्रदय  विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. सम्राट अशोकाचे पाईक असलेले डॉ. अशोक शीलवंत हे खऱ्या अर्थाने त्यांचा वारसा पुढे नेनारे म्हणून त्यांना संपूर्ण महाराष्ट्रताच नव्हे तर संपूर्ण भारतात एक वेगळी अशी  प्रभावी समाज प्रभोधनामुळे ओळख निर्माण केली होती.

ज्या प्रमाणे जगाला शांततेचा ,समतेचा ,बंधुतेचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा बौद्धधम्म सम्राट अशोकांनी दिक्षा घेतल्या नंतर अहींसेचा मार्ग अवलंबला व 84000 स्तूप व 14 शिलालेख स्थापन केले. ज्या ठिकाणी तथागत गौतम बुद्ध यांचे जीवनाशी निगडित असलेल्या महत्वाचे होते.अगदी त्याच प्रमाणे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनामध्ये जे ठिकाण महत्वाचे आहे अश्या 14 ठिकाणी अशोकस्तंभ शिलालेख स्थापन करण्याचे अशोक शीलवंत यांचे ध्येय होते. त्यापैकी लोनावला,रत्नागिरि ,येवला, आग्रा, सन्नती(कर्नाटक),कोल्हापुर ,नागपुर, गोंदिया अश्या आठ ठिकाणी शिलालेख स्थापन केले.येवला येथे त्यांनी 4 था शिलालेख हा 12 एप्रिल 2011 रोजी स्थापन केला. या पार्श्वभूमीवर त्यांचे अस्थिस्थापन या शिलालेखात करण्यात आल्या.

बाकीच्या सहा ठिकाणी त्यांचा मुलगा राजरत्न अशोक शीलवंत हे स्वतः पूर्ण करतील अशी माहिती त्यांनी दिली.

शोकसभेच्या अध्यक्ष स्थानी राजेन्द्र बनसोडे हे होते तर सूत्रसंचालन शंकर जाधव यांनी केले. अशोक सर्वांगीन सोसायटी, अशोक नागरी सहकारी बँक, विक्रम नागरी पतसंस्था अश्या वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कार्य केले व बेरोजगाराना रोजंनदारी उपलब्ध करुन दिली. 
कार्यक्रमास समाधान पगारे, रोहिदास गायकवाड़, सुभाष गांगुर्डे, रविराज गोतीस,मछिन्द्र आहेर,अभिमन्यु शिरसाठ,संजय गरुड, प्रल्हाद जगताप,महेंद्र पगारे, संतोष लाठे,सिद्धार्थ त्रिभुवन,गौतम लाठे,संतोष आहेर,सागर हिरे,मिलिंद पगारे, मिलिंद गांगुर्डे,आकाश भालेराव, युवराज पगारे, गोरख गांगुर्डे,आदि समाज बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार अनिल जगताप यांनी मानले.
close