अहमदनगर, दि. 21 : जिल्हयातील शासकीय, निमशासकीय तसेच खाजगी आस्थापनांना सुचित करण्यात येते की, केंद्र शासनाने सेवायोजन कार्यालये रिक्तपदे अधिसूचित करण्याची सक्ती करणारा कायदा1959 व नियमावली 1960 अन्वये जिल्हयातील सर्व शासकीय /निमशासकीय /सार्वजनिक व खाजगी आस्थापनांना त्यांच्या आस्थापनेमध्ये व कार्यालयामध्ये कार्यरत आसणा-या मनुष्य बळाची माहिती प्रत्येक तिमाहीस विवरण पत्र (ई आर-1) सादर करणे कायद्याने बंधनकारक आहे.
तरी जिल्हयातील सर्व कार्यालीय,आस्थापना प्रमुखांना आवाहन करण्यात येते की,आपल्या आस्थापनेमध्ये , कार्यालयामध्ये कार्यरत असणा-या मनुष्यबाळांचे माहे जुलै ते सप्टेंबर 2020 या तिमाहीचे त्रैमासिक विवरणपत्र (ई आर-1) कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता आयुक्तालय, महाराष्ट्र शासन या विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.inया वेबपोर्टलवर ऑनलाईन भरणे आवश्यक आहे. विवरणपत्र (ई आर-1) विहीत मुदतीत ऑनलाईन न भरल्यास कायद्यातील कलम5(1) व 5 (2) नुसार कार्यवाही करण्यात येईल.याबाबत संबंधित कार्यालय आस्थापना प्रमुखांनी याची नोंद घ्यावी.
तसेच याबाबत काही अडचण असल्यास 0241- 2425566 या दूरध्वनी क्रमांकावर अथवा प्रत्यक्ष संपर्क साधाव असे आवाहन सहायक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता,अहमदनगर यांनी केले आहे

