shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने इंदापूर प्रशासकीय भवनासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन..!!

शेतकऱ्यांना तत्काळ मदत जाहीर करा अाशी केली मागणी..


इंदापूर प्रतिनिधी( तात्याराम पवार)

इंदापूर: दि.२०/१०/२०२०(ता. इंदापूर जि. पुणे) महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेले असून शेतकरी उध्वस्त झाला आहे. त्यामुळे लवकरात लवकर नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करून शासनाने तात्काळ मदत जाहीर करावी.तसेच राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट एकरी पन्नास हजार रुपये भरपाई थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी या प्रमुख मागणीच्या संदर्भात माजी मंत्री महादेव जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने इंदापूर तहसील कचेरी समोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले आहे.


इंदापूर प्रशासकीय इमारतीसमोर एक दिवशीय धरणे आंदोलन करताना राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते

यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष किरण गोफणे, पुणे जिल्हा  सरचिटणीस तानाजी मारकड, इंदापूर तालुका कार्याध्यक्ष अभिजित भाळे, इंदापूर शहर अध्यक्ष श्रीनिवास सातपुते, रूई (बाबीर) गावचे रासप अध्यक्ष अविनाश मोहिते,  व अन्य कार्यकर्ते, शेतकरी,उपस्थित होते.

close