shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कौठळी येथील लग्नकार्यासाठी राजवर्धन पाटील यांनी गाठला दुचाकीवरुन वाट काढत लग्नाचा मुहूर्त...!!

इंदापूर : प्रतिनिधी 

इंदापूर तालुक्याचे जनसामान्यांचे नेतृत्व निरा - भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील  यांनी आज दि. २९ रोजी  कौठळी (ता. इंदापूर ) येथील लग्नाचा मुहूर्त गाठण्यासाठी त्यांनी दुचाकीवरुन वाट काढत लग्नवेळ साधली. 

 



याबाबत सविस्तर वृत्त की, कौठळी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन भारत मारकड यांचे चिरंजीव गणेश  यांच्या विवाहाप्रसंगी कौठळी येथे जात असताना रस्ता पावसाच्या पाण्यामुळे अत्यंत खराब झाल्याने गाडी  विवाहस्थळापर्यंत  घेऊन जाणे शक्य नसल्यामुळे  राजवर्धनदादांनी दुचाकीवरुन प्रवास करुन विवाहाचा मुहुर्त गाठत समारंभास उपस्थित राहून वधू-वरांना पुढील यशस्वी वैवाहिक जीवनासाठी शुभाशिर्वाद दिला. 


विवाह सोहळा अत्यंत साधे पद्धतीने  व  कोविड विषयक नियमांचे पालन करुन पार पडल्याने त्यांनी कौतुक केले.  

राजवर्धन पाटील यांच्या सर्वांना बरोबर घेवून काम करण्याची पद्धतीमुळे तसेच जनतेच्या सुख- दु:खात धावून जात. जनसामान्यांचे नेतृत्व म्हणून त्यांनी जनतेच्या मनात घर केले आहे.

close