नगर । प्रतिनिधी (शिवा म्हस्के) :
नगर तालुक्यातील दहिगाव साकत येथील श्री राम मंदिर देवस्थानाच्या पब्लिक ट्रस्ट्र साठी सहाय्य धर्मादाय आयुक्त अहमदनगर यांच्या कार्यलयाकडुन अहमदनगर जिल्ह्यातून अर्ज मागविण्यात आले होते. त्या अनुषंगाने एकुण २९ अर्ज धर्मदाय आयुक्त यांच्या कार्यालय कडे प्राप्त झाले होते. या २९ अर्ज मध्ये एक अर्ज महिलांचा होता.
या सर्व उमेदवारांच्या मुलाखती घेऊन त्याद्वारे आज मा.साह्यक धर्मदाय आयुक्त तथा पिठासीन अधिकारी श्रीमती गीता प्र.बनकर यांच्या अध्यक्षतेखाली श्री राम मंदिर देवस्थान दहिगाव येथील विश्वस्त मंडळाची आज निवड जाहीर करण्यात आली. त्या पैकी देवस्थानाच्या घटने प्रमाणे ११ विश्वस्त मंडळ ची निवडी जाहीर झाल्या.
त्यात (१)अनंता द्रविड (२) रघुवीर द्रवीड(३)कचरु गायकवाड (४) महेंद्र चंदे(५)शिवहरी म्हस्के (६)आनशाबापु म्हस्के (७) रावसाहेब जावळे(८) उध्दव दुसुंगे (९) महादेव म्हस्के(१०) सुनिल म्हस्के (११)महेश म्हस्के या विश्वस्त मंडळाची तीन वर्षांच्या कालावधी साठी नेमणूक झाली आहे.पुढील मिटिंगमध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष ईतर पदांची निवीड जाहिर जाहिर केली जाईल.

