shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भटके-विमुक्तच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी भाजप भटके-विमुक्त आघाडी चे संघटन बांधणी... भाजप भटके विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष नरेंद्र पवार यांनी इंदापूर येथे केले स्पष्ट..!!

इंदापूर । प्रतिनिधी तात्याराम पवार

इंदापूर येथील भाजप भटके-विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष व माजी आमदार नरेंद्र पवार यांचा पश्चिम महाराष्ट्र दौरा निमित्त काल इंदापूर येथे स्वामीराज हॉटेल याठिकाणी भटके-विमुक्त कार्यकर्ते व महाराष्ट्राचे पश्चिम महाराष्ट्राचे संयोजक अशोक वनवे  सहसंयोजक गजानन वाक्षे व जिल्हाध्यक्ष शिवाजी तरंगे या पदाधिकारी यांची बैठक झाली त्यावेळी प्रदेशाध्यक्ष नरेंद्र पवार यांनी म्हटले की इंदापूर दौरा हा नुकत्याच झालेल्या भाजपा भटके-विमुक्त आघाडी च्या महाराष्ट्र प्रदेश व जिल्हा कार्यकारणी तील पदाधिकारी यांचा आढावा बैठक घेऊन महाराष्ट्रातील सर्व स्तरावर भटके-विमुक्त आघाडी चे संघटन बांधणी करण्यासंदर्भात या दौऱ्याची आयोजन करण्यात आले महाराष्ट्रातील भटके-विमुक्त यांच्यावर होणारा अन्याय अत्याचार यांना वाचा फोडण्यासाठी भाजप भटके-विमुक्त आघाडी या जनतेच्या पाठीशी असून त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी या आघाडीची उभारणी झालेली असून या माध्यमातून हे कार्य करणार आहे यावेळी इंदापूर तालुक्यातील धनगर समाज यांच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर प्रदेशाध्यक्ष या नात्याने माझा पूर्ण पाठिंबा राहील तसेच इंदापूर तालुक्यातील भटके-विमुक्त समाजातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश संयोजक अशोक वनवे व पुणे जिल्हा अध्यक्ष शिवाजी तरंगे यांच्या माध्यमातून तालुका स्तरावरील कार्यकारणी भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांच्या सहभागातून तयार करून भटके-विमुक्त असणाऱ्या सर्व जनतेचे कामे मार्गी लावण्यासाठी त्यांचे विशेष प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट तरंगे यांनी केले.



हॉटेल स्वामीराज इंदापूर येथे भटके-विमुक्त च्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नरेंद्र पवार


प्रसंगी  युवा मोर्चा प्रदेश सचिव अभिजित देवकाते, पुणे जिल्हा भटके विमुक्त अध्यक्ष शिवाजी तरंगे, पोपट कचरे ,शिवाजी  देवकाते, माउली मारकड,हाणूमंत निंबाळकर, गणेश सूळ, राजेंद्र जमदाडे,मुबारक सय्यद,आमोल गलांडे, पांडूरंग सूळ, महादेव डोंबाळे,राम जाधव,, विकास सांगवे  शिवाजी गायकवाड व अण्य भटके समाजाचे प्रतिनिधी हाॅटेल स्वामिराज येथे आयोजित मिटींग मध्ये हजर होते.
close