shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मालमत्ताकर माफी वरुन शिर्डी न.पं.चा सत्ताधारीगट व मालमत्ता विरोधी समितीमध्ये बैठकित खंडाजंगी...!!


सावळीविहीर (प्रतिनिधी):
 शिर्डीमध्ये कोरोनाच्या काळात मालमत्ताकर ,पाणीपट्टी ,घरपट्टी व न,पं,च्या व्यापारी गाळ्याचे भाडे माफ करण्याऐवजी शिर्डीतील रहिवाशांची शिर्डी नगरपंचायतकडुन  घोर निराशा होत।आहे.त्यामुळे आतातरी शिर्डी नगरपंचायतच्या सत्ताधारी सदस्यांनी घरपट्टी ,पाणीपट्टी माफ करावी.अशी मागणी शिर्डीतील मालमत्ताकर विरोधी समितीचे अध्यक्ष डॉक्टर एकनाथराव गोदंकर तसेच शिवसेना नेते कमलाकर कोते व इतर नेत्यांनी केली असून आज गुरुवारी दि,२२रोजी शिर्डी नगरपंचायत मध्ये सत्ताधारीगट ,प्रशासन, मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे व मालमत्ताकर विरोधी समितीचे अध्यक्ष डॉक्टर एकनाथराव गोदंकर व सर्व सदस्य यांची बैठक झाली, या बैठकीतही या मालमत्ता कर मुद्द्यावरून प्रशासन ,सत्ताधारी गट व मालमत्ताकर विरोधी समितीमध्ये खडाजंगी झाल्याचे दिसून आले.

प्रशासन व सत्ताधारी गट यांच्यामध्ये या मुद्द्यावर ताळमेळ दिसत नव्हता. त्यामुळे मालमत्ता कर विरोधी समितीचे सर्व सदस्य हे संतप्त झाले होते. शिर्डी शहरातील रहिवाशांना कोरोना संकटकाळात घरपट्टी ,मालमत्ताकर, पाणीपट्टी तसेच नगरपालिकेच्या व्यापारी संकुलातील गाळ्याचे भाडे माफ करण्यात यावे .अशी मागणी रहिवाशांनी केली होती.अनेकदा मागणी केल्यानंतर शिर्डी नगरपंचायतच्या सत्ताधारी गटाने मात्र या सर्वांची एक प्रकारे फसवणूक केली आहे.शिर्डीतील मालमत्ताकर विरोधी समितीचे अध्यक्ष डॉक्टर एकनाथ गोंदकर यांनी नगरपंचायत कडे माहिती अधिकाराची माहिती मागवली।होती. हा कर माफ करण्यासाठी न,पं ने मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना एकपत्र दिले. मात्र ते नगराध्यक्षाचे लेटर पॅडवर खाजगी असून त्यावर आवक जावक क्रमांक काही नाही. 

त्याच प्रमाणे नगरपालिकेने कोणताही सदस्यांचा ठराव याबाबत केलेला नाही. नगरपंचायतीला घरपट्टी, मालमत्ताकर, पाणीपट्टी ,माफ करण्याचा अधिकार असतानाही नगराध्यक्षाच्या लेटरपॅडवर मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत आहे. तरी या नगरसेवकाच्यां सत्ताधारी गटाने यासंदर्भात लोकांची निराशा किंवा फसवणूक करु नये.नगर पंचायतीच्या सत्ताधारी गटाने ठराव करून घरपट्टी, मालमत्ता कर पाणीपट्टी, माफ करता येते व यापुढे तरी त्यांनी ती सत्ताधारी गटाने ठराव करून घरपट्टी पाणीपट्टी ,मालमत्ता कर माफ करावी.उगाच मुख्यमंत्र्यांना लेटर पॅडवर पत्र पाठवून शिर्डी कराची फसवणूक करू नये. असे मालमत्ताकर विरोधी समितीने यावेळी बैठकीत  म्हटले आहे. 

यावेळी डॉक्टर एकनाथ गोंदकर, शिवसेनेचे कमलाकर कोते, राष्ट्रवादीचे निलेश कोते, तसेच शिवसेनेचे अनिताताई जगताप आदींसह अनेक सदस्यांनी यावेळी बैठकीत भाग घेतला. तर शिर्डी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे तसेच मुख्य लिपिक मुरलीधर देसले ,त्याचप्रमाणे सत्ताधारी गटाचे नितीन कोते, मंगेश त्रिभुवन ,आदींसह नगरसेवक, अधिकारी, यावेळी बैठकीत उपस्थित होते. मात्र या बैठकीत प्रशासन, सत्ताधारी गट, यांच्यामध्ये मालमत्ताकर मुद्द्यावरून ताळमेळ दिसून येत नव्हता. त्यामुळे तसेच न,पं,ने नीट माहीती दिली नाही.त्यामुळे मालमत्ताकर विरोधी समितीचे सदस्यही संतप्त झाले होते व त्यावरून येथे बैठकीतच या मुद्द्यावरून खडाजंगी झाल्याचे दिसून येत होते.
close