प्रतिनिधी । मोहन शेगर
अहमदनगर :- जिल्ह्याचे भूषण, आदर्श गाव हिवरे बाजार चे सरपंच पद्मश्री. मा.पोपटराव पवार यांनचे मार्गदर्शन व आशीर्वाद घेण्याकरिता नूतन जिल्हाध्यक्ष मा.प्रतिक बारसे हे जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांसह गेले असता त्यांचा सत्कार करीत येणाऱ्या आगामी काळात राजकीय वाटचालीस शुभेच्छा देत, आद.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली वंचित समूहाला संघटित करण्यासाठी,त्यांच्या न्याय व हक्कांसाठी कार्यरत राहण्यासाठी प्रतिक बारसे सारख्या कार्यक्षम तरूण नेतृत्वाला अहमदनगर दक्षिण जिल्ह्याची जबाबदारी दिली.
त्यासाठी मा.प्रतिक बारसे यांना शुभेच्छा दिल्या.
तसेच मा.योगेश साठे यांचाही सत्कार पद्मश्री.मा.पोपटराव पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी मा.ऍड.संतोष गायकवाड, मा.ऍड.विजय महाजन, मा.जग्गू दादा गायकवाड यांच्या सह हिवरे बाजार गावाचे ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

