shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर तालुका शिवसेनेच्या वतीने पत्रकार कैलास पवार यांची ह्यमन राइट्स पुणे जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सन्मान करण्यात आला..!!


इंदापूर । प्रतिनिधी ( तात्याराम पवार)
इंदापूर: २९/१०/२०२० रोजी
हा सन्मान शिवसेनाभवन मध्यवर्ती कार्यालय इंदापूर येथे  करण्यात आला इंदापूर तालुका शिवसेना पदाधिकारी व पुणे जिल्हा शिवसेना  समन्वयक विशाल बोंद्रे , इंदापूर शिवसेना तालुकाप्रमुख नितीन शिंदे,  इंदापूर शिवसेना शहर प्रमुख मेजर महादेव सोमवंशी , दुर्गाश शेवाळे , अरुण पवार इतर मोठ्या संख्येने  शिवसेना पदाधिकारी यांच्या उपस्थित ह्यमन राइट्स जनहित मानवाधिकार पुणे जिल्हा अध्यक्षपदी पत्रकार कैलास पवार यांची निवड झाल्याबद्दल आज इंदापूर येथे शिवसेनाभवन मध्यवर्ती कार्यालयामध्ये मोठ्या सोशल डिस्टन तंतोतंत पालन करत सत्कार आयोजित केला होता यावेळी पुणे जिल्हा समन्वयक विशाल  बोंद्रे म्हणाले निस्वार्थ आणि निर्भिडपणे कुठलीही अपेक्षा न  करता, कधीच कुठल्या पदाची मागणी न करता समाजासाठी , सतत शेतकरी ,दिन दलित व  वंचित, सर्व सामान्यासाठी पत्रकार करणारे , कुठल्याही मान पानाची अपेक्षा न करता इंदापूर तालुक्यात पत्रकारिता करत असताना आज अतिशय मला आनंद होतोय की एक निस्वार्थी पणे पत्रकारिता करत असताना, सामाजिक काम ,असताना अनेक क्षेत्रात काम करत असताना पत्रकार कैलास पवार यांची ह्यमन राइट्स जनहित मानवाधिकार पुणे जिल्हा  अध्यक्ष म्हणून निवड झाली सर्व शिवसेनेच्या वतीने मी त्यांचे अभिनंदन करतो. मनःपूर्वक शुभेच्छा देतो. 


यावेळेस इंदापूर तालुका शिवसेनाप्रमुख नितिन शिंदे म्हणाले की इंदापूर तालुक्यात शिवसेनेची प्रत्येक बातमी पाठवल्या नंतर  किंवा प्रत्यक्ष येऊन बातमी फिल्डवर येऊन घेतली असता किंवा माहिती दिली असता जशी आहे तशी कुठलाही दुजाभाव न करता बातमी चांगल्या पद्धतीने लिखाण करून  दिली जाते अनेक सामाजिक कामात अग्रेसर आणि सामाजिक कामाचा अनुभव आणि सामाजिक कामाची जाण असणारे, इंदापूर तालुक्यात निस्वार्थपणे  काम करत असताना अशा कामाची पोचपावती म्हणून आज इंदापूर तालुक्याचा आणि त्यांच्या स्वतःच्या गावाला सुद्धा एक अतिशय मानाचा तुरा  शिरपेचात ओवला गेला आहे आज महाराष्ट्रात आणि दिल्लीपर्यंत ह्यमन राइट्स जनहित मानवाधिकार  संघ या संघटनेच्या माध्यमातून आपल्या ग्रामीण भागातला पत्रकार या संघटनेच्या पदावर गेला आणि काम करत आहे आम्हाला शिवसैनिकांना आनंद झाला असून सर्व शिवसेनेच्या पदाधिकारी यांच्या वतीने मी अभिनंदन व शुभेच्छा देतो. यावेळी अनेक शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याचप्रमाणे पत्रकार तात्याराम पवार आणि नलवडे हे उपस्थित होते स्वागत आणि सत्कार केल्याबद्दल पत्रकार ,ह्यमन राइट्स जनहित मानवाधिकार पुणे जिल्हा अध्यक्ष कैलास पवार यांनी सर्वांचे आभार मानले.
close