इंदापूर । प्रतिनिधी तात्याराम पवार
पोंधवडी दिनांक ३०/०९/२०२० रोजी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र तक्रारवाडी अंतर्गत ग्रामपंचायत पोंधवडी च्या वतीने गावांमध्ये माझे कुटुंब माझी जबाबदारी या अभियानाची सुरुवात आदर्श सरपंच नानासाहेब बंडगर यांच्या हस्ते धर्मल गण प्लस आ कसीमीटर च्या साह्याने कोरोना लक्षणांची तपासणी करण्यात आली यावेळी उपस्थित तंटामुक्त समितीचे अध्यक्ष डॉ खारतोडे मा उपसरपंच दतु पवार मा उपसरपंच संजय भोसले डॉ मृदुला जगताप डॉ शरद ससाणे उषा यादव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पोंधवडी मधील शिक्षक पवार वस्ती शाळेचे शिक्षक बंडगरवाडी शाळेचे शिक्षक यांच्या साहाय्याने करण्यात येत असल्याची माहिती डॉ मृदुला जगताप यांनी दिली त्या पुढे म्हणाल्या की दिवसात 16 व्याक्तीच्या साहाय्याने पोंधवडी गावात बंडगवाडी पवारवाडी मध्ये सर्व ग्रामथांचा सर्वे करण्यात आला आहे.
तसेच ग्रामपंचायत च्या वतीने सेनीटायझर ग्लोज आले आहे अशी माहिती डॉ मृदुला जगताप यांनी सांगितले
डॉक्टर मृदुला जगताप या एक संयमी व कार्य कुशल अशा डॉक्टर असून त्यांच्या या कार्यामुळे या परिसरात आरोग्य सेवा चांगल्या पद्धतीने मिळत असल्याचे मत माजी उपसरपंच संजय भोसले यांनी यावेळेस व्यक्त केले

