shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मोरेचिंचोरात आ.रोहितदादा पवार यांच्या वाढदिवसा निमित्त वृक्षारोपण...!!

प्रतिनिधी। मोहन शेगर :
सोनई-महाराष्ट्रातील युवा पिढीचे आधारस्तंभ कर्जत जामखेडचे आ.रोहितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आदर्श गाव मोरेचिचोंरा ता.नेवासा जि. अहमदनगर येथे यशवंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत पाटील गडाख यांच्या प्रेरणेने सुरू केलेला 365 दिवस वृक्षारोपण या उपक्रमाअंतर्गत आ.रोहितदादा पवार यांच्या वाढदिवस मोरेचिंचोरा येथील टेकडीवर वृक्षारोपन करून साजरा करण्यात आला.


यावेळी अहमदनगर जलसाक्षरता समितीचे सदस्य जलप्रेमी संदिप दरंदले पाटील समवेत वृक्षमिञ सचिन तुवर सर तसेच रोहितदादा पवार मिञमंडळाचे सदस्य यावेळी उपस्थित होते.सदर लावलेल्या झाडाचा दरवर्षी वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे.यावेळी यशवंत प्रतिष्ठाणचे समन्वयक देवदत्त दरंदले सर व दराडे सर यांनी वृक्षारोपन चळवळीबाबत मार्गदर्शन केले.

यशवंत प्रतिष्ठाणचा वाढदिवशी वृक्षारोपन  हा उपक्रम सुरू झाल्या पासुन रोज तालुक्यातुन नागरिक कुणाच्या वाढदिवसाला वा नातेवाईकाच्या स्मृती प्रित्यर्थ वृक्षारोपन करत असल्याची माहिती देवदत्त दरंदले यांनी दिली.
close