shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सोनिजवळा येथे डी सी सी बँक चे एटीएम वितरण..!!



जिल्हा बँकेच्या पिककर्जामुळे  शेतकऱ्यांना आधार -------!!ऋषिकेश आडसकर..!!

बीड  | जिल्हा प्रतिनिधी  : प्रकाश मुंडे   :-                  
केज:
तालुक्यातील सोनिजवळा येथे जिल्हा मध्यवर्ती बँक च्या  खातेधारक शेतकऱ्यांना  एटीएम वितरण करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोक भांडवलकर , जिल्हा बँकेचे संचालक ऋषिकेश आडसकर, भाजपा जेष्ठ नेते सुरेंद्र तपसे कृषि उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती लक्ष्मीकांत लाड बँक इन्स्पेक्टर  आर टी मुळे,मंडळ अधिकारी भागवत पवार आदींच्या हस्ते एटीएम वितरित करण्यात आले.यावेळी बोलतांना तपसे म्हणाले  जिल्हा मध्यवर्ती बँक शेतकऱ्यांचा कणा असल्याचे मत व्यक्त केले. 


 
ऋषीकेश  आडसकर म्हणाले सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधार मिळाला आहे. 

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शेतकऱ्यांची बँक अशी ओळख आहे यावर्षी बँकेने कात टाकून मागेल त्याला पीक कर्ज वाटप  केले शेतकऱ्यांना सुविधा मिळाल्या पाहिजेत यासाठी प्रयत्न करत राहू असे मत व्यक्त केले. यावेळी उपस्थितांच्या हस्ते एटीएम वितरित करण्यात आले कार्यक्रमास,गोविंद ससाणे,  ,मिनाज पटेल ,प्रकाश भांडवलकर,रत्नाकर भांडवलकर,अरुण भांडवलकर,रामकृष्ण भांडवलकर,शरद ससाणे ग्रा प सदस्य पती जीलान शेक,अभिमान ससाणे,दत्तात्रय ससाणे,तुळशीराम सूर्यवंशी,पत्रकार दशरथ चवरे आदींची उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वीतेसाठी चेअरमन रवी भांडवलकर ,मिनाज पठाण सह टीमने परिश्रम घेतले.सोशल डिस्टन्स पाळून कार्यक्रम घेण्यात आला.
close