shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर पंचायत समिती येथे आरोग्य केंद्रासाठी रुग्णवाहिकेचे लोकार्पण... उपसभापती संजय देहाडे व रुग्ण कल्याण समिती सदस्य महेंद्रदादा रेडके यांच्या हस्ते..!!


इंदापूर: इंदापूर दिनांक १/१०/२०२० रोजी इंदापूर पंचायत समिती यांच्यावतीने इंदापूर तालुक्यातील आरोग्य केंद्रासाठी पाच रुग्णवाहिका सध्या उपलब्ध करून देण्यात आल्या त्याचे लोकार्पण पंचायत समितीचे उपसभापती संजय देहाडे व रुग्ण कल्याण समितीचे सदस्य महेंद्रदादा रेडके यांच्या हस्ते करण्यात आले.
गेल्या अनेक दिवसापासून इंदापूर तालुक्यातील रुग्णांसाठी रुग्णवाहिकांची ची गरज भासत होती.


 
ही रुग्णवाहिका उपलब्ध करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य मुख्य जिल्हा अधिकारी यांच्या वतीने इंदापूर रुग्ण कल्याण समिती ती स्थापन करून इंदापूर तालुक्यातील ग्रामपंचायत मधील 14 वा वित्त आयोगातील लोकसंख्या प्रमाणे निधी जमा करून ज्या त्या प्राथमिक आरोग्य केंद्रांना त्या निधी मार्फत रुग्णवाहिका रुग्णांच्या सेवेसाठी आज रोजी ५ रुग्णवाहिका उपलब्ध करून त्यांचे लोकार्पण करण्यात आले. उर्वरित तीन रुग्णवाहिका लवकरच येणार आहेत. अशी माहिती  संजय देहाडे यांनी दिली यावेळी जिल्हा परिषद सदस्य ,पंचायत समिती सदस्य, इंदापूर पंचायत समितीचे अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.
close