इंदापूर । प्रतिनिधी (तात्याराम पवार)
तरंगवाडी 3 ऑक्टोबर 2020 रोजी तरंगवाडी येथील गेली काही दिवसापासून इंदापूर ते बारामती या रस्त्यापासून जाणारा रस्ता बुटे वस्ती ,शिंदे वस्ती, हरणावळ वस्ती ,सांगवे वस्ती, जाधव वस्ती, माने वस्ती ते कर्मयोगी कारखान्याकडे जाणाऱ्या मार्गावर अनेक खड्डे पडल्याने पाणी साठवून रस्त्याची पूर्णपणे दुरावस्था झाली असल्याने सदर रस्त्यावरून शेतकऱ्यांचे व नागरिकांचे रहदारीचा रस्ता असल्याने या रस्त्याचे दुरुस्तीकरण करणे गरजेचे होते सदर या रस्त्यावर सामाजिक जाणीव जपणारे आणि शेतकऱ्यांच्या कष्टाला व त्यांना होणाऱ्या समस्या सोडवण्याच्या भूमिकेतून तरंगवाडी व तेथील दानशूर व्यक्तींनी या रस्त्यामधील अतिशय मोठ्या प्रमाणात दुरावस्था झालेल्या रस्त्यावर मुरूम टाकून एक ते दीड किलोमीटर रस्ता मुरम टाकून भरून घेऊन रस्त्याची दुरुस्ती केली व शेतकऱ्यांना जाण्यासाठी योग्य असा रस्ता करून दिला या रस्त्याला विशेष सहकार्य सामाजिक कार्यकर्ते शेखर पाटील अण्णा नायर ,बाळासाहेब नरूटे विकास सांगवे ,सुदाम हरणावळ ,इत्यादी मान्यवरांनी सहकार्य केले तर या रस्त्याची देखभाल प्रदीप बुटे, लक्ष्मण बुटे, दादा सांगवे ,सुहास बुटे इत्यादींनी केली .हा रस्ता दुरुस्त केल्याने येथील जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकातून आनंद व्यक्त होत असून सर्व सहकार्य करणाऱ्या मान्यवरांचे कौतुक होत असल्याचे युवा नेते मा श्री पोपट कचरे यांनी सांगितले भाजपचे युवा कार्यकर्ते पोपट कचरे यांनी या कामात पुढाकार घेऊन कार्य पार पाडले व सर्वांचे कौतुक करून जाहीर आभार केले वरील सर्व माहिती त्यांनी यावेळी दिली.




