shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बाभूळगाव आणि वडापुरी येथे महात्मा गांधी जयंती साजरी..!!


इंदापूर  । प्रतिनिधी
वडापुरी:२ ऑक्टोबर २०२० रोजी बाभूळगाव व वडापुरी येथील ग्रामपंचायत कार्यालयात महात्मा गांधीजी यांच्या जयंतनिमित्त प्रतिमेला पुष्प हार घालून विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी सदर कार्यक्रमात गांधीजींच्या विचारांची प्रेरणा घेऊन सामाजिक कार्यातून गावाचा व सर्वसामान्य जनतेचा विकास साधण्याचे कार्य कशा पद्धतीने करायचे व आलेल्या संकटांना सर्वांना सामावून घेऊन त्यावर मात कसे करायचे याबाबत विचार विनिमय करण्यात आले यावेळी बाभूळगाव येथे सामाजिक कार्यकर्ते अमोलराजे इंगळे व बापूराव मोरे, संग्राम मोरे, दिनेश वाईकर, नारायण आसबे, अजित गायकवाड, अवधूत हराळे, यश आवताडे, वैभव गाडेकर, आण्णा लोंढे .अमोलराजे मित्रपरिवार तर वडापुरी येथे तंटामुक्त अध्यक्ष शिवाजी तरंगे ग्रामपंचायत  सदस्य विठ्ठल कदम  गणेश चंदनशिवे ,देवकर सर ग्रामपंचायतीचे कर्मचारी दादासाहेब चदनशिवे ,संजय तोबरे  ,महेश देवकर,नारायण पवार इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

बाभुळगाव येथे विनम्र अभिवादन करताना सामाजिक कार्यकर्ते अमोलराजे  इंगळे व मित्रपरिवार

वडापुरी येथे ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ विनम्र अभिवादन करताना

close