नारायणडोह । प्रतिनिधी (रफिक शेख) :
नगर तालुक्यातील वाळकी गटातील नगर-सोलापूर रस्त्यावरील गावानिहाय दौरा शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमुख प्रा.शशिकांत गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज दरेवाडी, वाळुंज,पारगाव,शिराढोण,साकत,दहिगाव,वाटेफळ,रूईछत्तीसी, गुंणवंडी,अंबिलवाडी,मंठपिप्रि,हातवळण, आदी गावांत आज पंचायत समिती सभापती प्रविण कोकाटे, शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र भगत यांच्या मार्फत शिवसैनिक सभासद नोंदणी करुन सभासद नोंदणी पत्र वाटप केले.
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी शिवसेनापक्ष नेहमी आग्रही भूमिका घेत असतो.या अभियाना मध्ये शिवसैनिक नवतरुण मोठ्या संख्येने सभासद नाव नोंदणी केली.
या प्रसंगी दहिगाव शाखा प्रमुख आन्हाड संतोष, गुलाब फुलमाळी, शाखा प्रमुखप्रविण गोरे रुईछत्तीसी,साकत खुर्द शाखा अध्यक्ष सुर्यभान निमसे, संपत वाघमोडे,महादेव गायकवाड, अंकुश कालेॅ ग्रा.पं.सदस्य,पाराजी हाटकर, शिवा बोचरे,शिवा म्हस्के,सुलेमान सय्यद , सुनिल म्हस्के,याकुब सय्यद,रामा साळूंके,संजय पोटरे, बाळासाहेब म्हस्के,हरी जावळे, दहिगाव ,साकत,रुईछत्तीसी येथील नागरिक शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

