shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मत्स्यव्यवसाय वाढण्यासाठी हेगडे परिवाराने सुरू केलेला व्यवसाय नक्कीच मदत करेल... माजी मंत्री हर्षवर्धन पाटील..!!


इंदापूर । प्रतिनिधी (तात्याराम पवार)
निमगाव केतकी दि.४ ऑक्टोबर २०२० रोजी महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री मा. श्री. हर्षवर्धनजी पाटील व आदरणीय वहिनीसाहेब यांच्या शुभ हस्ते श्री. हनुमंत अर्जुन हेगडे व श्री. अभिजीत हनुमंत हेगडे यांनी सुरू केलेल्या काव्या फिश फीड या व्यवसायाच्या उद्घाटन समारंभ पार पडला. यावेळी हर्षवर्धन जी पाटील म्हणाले की उजनी धरण परिसर आणि इंदापूर तालुक्यामध्ये अशा प्रकारचा व्यवसाय सुरू झाल्याने मत्स्य व्यवसाय करणाऱ्या सर्वांनाच याचा फायदा होईल तसेच या व्यवसायामुळे अनेकांच्या हाताला काम मिळेल. 


तालुक्यात मत्स्यव्यवसाय वाढण्यासाठी हेगडे परिवाराने  सुरू केलेला व्यवसाय नक्कीच मदत करेल. मत्स्य औषधे व मत्स्य खाद्य निमगाव येथे उपलब्ध झाल्याने आजूबाजूला असणाऱ्या शेततळ्याच्या माध्यमातून मत्स्य व्यवसाय वाढीला लागेल. असे मत व्यक्त करत हेगडे परिवाराचे  कौतुक करून त्यांच्या व्यवसायिक वृद्धीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. यावेळी गावातील प्रमुख मान्यवर व हेगडे मित्रपरिवार सदस्य उपस्थित होते. काव्या फिश फीड या व्यवसायाचे उद्घाटनास हर्षवर्धनजी पाटील व वहिनीसाहेब उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे यावेळी जाहीर आभार मानण्यात आले.

close