इंदापूर । प्रतिनिधी (तात्याराम पवार )
इंदापूर दि. ८ ऑक्टोबर २०२० रोजी इंदापूर येथील विद्यानंद को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड इंदापूर शाखा वर्धापन दिनानिमित्त सामान्य ग्राहकांना कोरणा च्या भीषण परिस्थिती सामाजिक जाणीव लक्षात घेऊन सोने तारण मिळावा आयोजित करून याद्वारे सर्व ग्राहकांना सोने तारण १४% वरून तब्बल चार टक्के कपात करून १० मिनिटात १० टक्के* मध्ये कर्ज उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली आहे इतर आर्थिक स्तोत्र ग्राहकांना सोने तारण मध्ये ज्यादा व्याजदराने कर्जपुरवठा करीत असतानाही कोरोना सारख्या परस्थिती पाहता हे संकट मर्यादित नसून जगावर आलेले संकट आहे सर्वसामान्य ग्राहक केंद्रबिंदू मानून विद्यानंद बँकेने इंदापूर शाखेच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त सोने तारण कर्ज अगदी अल्प दरात म्हणजे १०% व्याज दरात सुरू करत असल्याने सामान्य ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे .
या योजनेद्वारे ग्राहकांना १ लाखास दरमहा ८३० रुपये व्याज द्यावे लागणार आहे जे इतर आर्थिक स्तोत्र पेक्षा कित्येक पटीने कमी आहे याचा सर्व ग्राहकांनी लाभ घ्यावा असे आवाहन बँकेचे अधिकारी श्रीयश नलवडे यांनी करून वरील प्रतिक्रिया दिल्या या बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हा परिषद सदस्य युवारत्न अंकिताताई पाटील ,युवा नेते राजवर्धनदादा पाटील,शिवसेनेचे इंदापूर तालुका प्रमुख नितीन शिंदे यांनी बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.

