shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

संगमनेर : संगमनेर मध्ये परतीच्या पावसाने तालुक्यातील हजारो हेक्टर ऊस भुईसपाट.. , बळीराजा चिंतेत...!!



संगमनेर:- परतीच्या पावसाच्या फटक्याने संगमनेर तालुक्यातील हजारो हेक्टर शेती भुईसपाट. यावर्षी संगमनेर तालुक्यात ओल्या दुष्काळाने खूप मोठं नुकसान झाले आहे. परतीचा पाऊस काय जायलाच तयार नाही. तर संगमनेर ऊस उत्पादकांचे या पावसामुळे खूप मोठे नुकसान झाला आहे.

शेतकरी वर्ग हा मदत करायची तेव्हा करा पण  सध्या आमच्या नुकसान भरपाईचे पंचनामे करा. अशी आर्त मागणी करू लागला आहे. यातून बळीराजाचे  दुःख व्यक्त होत आहे. एवढे मोठे नुकसान झाले तरी शासनाकडून अजूनही पंचनाम्याला कोणी आले नाही. आम्ही कर्ज काढून एवढा मोठा खर्च करतो की, आम्हांला पुढे काहीतरी भेटेल या अपेक्षेने, पण जर पाऊसा ने असेच नुकसान केले तर आम्हांस दु:ख व्यक्त केल्याशिवाय दुसरे काय..??  जर शासनाने पंचनामा करून नुकसान भरपाई नाही केली तर आम्हांला आत्महत्या शिवाय काही पर्याय राहणार नाही. ..!

शासनाने नुसत्या कागदी घोषणा न देता शेतकऱ्यांची मदत करावी. व लवकरात लवकर उसाचे पंचनामे करून शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावी. अशी शेतकऱ्यांची आर्त मागणी होत आहे.
close