shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मुंबई गोवा महामार्गावरील अपघातांची मालिका पुन्हा सुरू..!!



रायगड/पेण: अलिबाग प्रतिनिधी (राजेश बाष्टे)
जिते येथे बाईकस्वार घसरून एक गंभीर जखमी

अपघातग्रस्तास देवदूत कल्पेश ठाकूर यांची त्वरित मदत..


लॉकडाउनच्या काळात बंद असणाऱ्या मुंबई - गोवा महामार्गावर तब्बल दोन महिन्यानंतर वाहतूक सुरू झाली असून या वाहतुकीबरोबरच दोन महिने खंडित राहिलेली अपघातांची मालिका पुन्हा सुरू झालेली आहे. पेण जिते गावाजवळ रात्रौ 12:30 दरम्यान वडखळ कडून पनवेलकडे जात असताना रस्त्यावरील वाळूवर घसरून मोटरसायकलस्वार आदिनाथ त्रिंबक दराडे (वय 32) रा.बीड गंभीर जखमी झाला,अपघाताची बातमी कळताच अपघातग्रस्तांचेवाली कल्पेश ठाकूर यांनी गंभीर जखमीस प्राथमिक उपचाराकरिता पेण उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केले.
close