*पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी कक्ष व आळेफाटा पोलीस स्टेशनची कारवाई...!!
आळेफाटा। प्रतिनिधी:
काल दिनांक 16 10 2020 रोजी रात्री पुणे ग्रामीण एटीएस पथकाचे किरण कुसाळकर व महेंद्र कोरवी हे आळेफाटा हद्दीत पेट्रोलिंग करत असताना गोपनीय बातमी द्वारा मार्फत गोपनीय माहिती मिळाली की आळेफाटा येथे एका ठिकाणी बेकायदेशीररित्या अवैद्य गुटखा हा साठा करून ठेवलेला आहे. म्हणून एटीएस पथकाचे प्रभारी अधिकारी अर्जुन मोहिते यांना सदर बातमी फोन द्वारे कळविली यावरून त्यांनी वरिष्ठांना कळवले.
वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर यांना कळवून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्याप्रमाणे एटीएस पथकाचे किरण कुसाळकर व महेंद्र कोरवी हे आळेफाटा पोलीस स्टेशनला जाऊन पोलीस निरीक्षक व आळेफाटा पोलीस स्टेशन चा स्टाफ सोबत घेऊन गुटख्याचा अवैद्य साठा असलेल्या ठिकाणी जाऊन कारवाई केली.
सदर ठिकाण हे बाबाजी उर्फ गणेश वाजे यांच्या मालकीचे असून त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या हीरा, विमल, आर एम डी असा तंबाखू मिश्रित गुटखा(16, 20, 000 )सोळा लाख वीस हजार रुपयाचा गुटख्याचा मुद्देमाल अवैधरित्या ताब्यात मिळालेला आहे. सदर इसम व तंबाखू मिश्रित गुटका मुद्देमाल ताब्यात घेऊन सदर आरोपीविरुद्ध आळेफाटा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे
सदरची कामगिरी ही मा.पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जावळे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर,सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस उपनिरीक्षक डौले, एटी एस पथकाचे किरण कुसाळकर, महेंद्र कोरवी ,पो. ना.पठारे ,पो. ना. लोंढे ,पो. शि. आनंदगावकर ,पो. शि. डामसे,पो. शि.वैद्य, पो शि गर्जे, पो शि कुलकर्णी, पो शि करे या पथकाने केली आहे.

