shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

प्रसंगावधान दाखवून दहिसर कोरोना केंद्रातील आग रोखणाऱ्या वैद्यकीय कर्मचारी व परिचारिकांचा शिवसेने तर्फे सन्मान..!!

दहिसर पश्चिम कांदरपाडा येथील आय.सी.यु. कोव्हीड सेंटरच्या एका मशिनरीला काल दुपारी अचानक आग लागली. त्यावेळी उपस्थित डॉक्टर व नर्स यांनी प्रसंगावधान दाखवत सदर आग त्वरित विझवली. तात्काळ आग आटोक्यात आणणाऱ्या स्टाफ नर्स अनुपमा तिवारी, काजल कनोजिया, ममता मिश्रा तसेच डॉक्टर रवि यादव, डॉक्टर आकाश कलासकर, व वॉर्डबॉय जतीन यांनी कोव्हीड सेंटरमधील अग्निशमन यंत्रणेचा वापर करुन त्वरित आग आटोक्यात आणली. यावेळी मोठी दुर्घटना टळली. त्यांच्या सतर्कते मूळे रूग्णांचे जीव ही वाचवले.





या शूरवीरांचा सन्मान शिवसेना उपनेते, म्हाडा सभापती विनोदजी घोसाळकर व शिवसेना विभागप्रमुख, आमदार विलास पोतनीस व आरोग्य समिती अध्यक्षा प्रविणा मोरजकर यांच्या हस्ते सत्कार आज करण्यात आला. नर्स, डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या या धाडसाचे कौतुक करताना नुकतीच नवरात्रोत्सव साजरा झाला या दिवसात स्त्री सामर्थ्याचा अभूतपूर्व जागर होत असतो. आदिशक्ती म्हणून स्त्रीशक्तीचा कौतुकमिश्रित गौरव आज शिवसेने तर्फ केल्याचे घोसाळकरांनी सांगितले.

तसेच गेले सहा महिने वैद्यकीय कर्मचारी योद्ध्या प्रमाणे काम करीत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे यांच्या सूचनेनुसार केलेल्या उपाययोजनांमुळे आज कोरोना नियंत्रणात आला आहे. कोरोना काळात जीवावर उदार होऊन कार्य करणाऱ्या वैद्यकिय कर्मचाऱ्यांचाया सत्कार करणे ही शिवसेनेची जबाबदारी आहे असे प्रतिपादन शिवसेना विभाग प्रमुख,आमदार विलास पोतनीस यांनी केले.


दहिसर कांदरपाडा येथील कोरोना केंद्रातील कर्मचाऱ्यांचे पर्यटनमंत्री, शिवसेना नेते आदित्य ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर व पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनीही कौतुक केले आहे.


यावेळी प्रभाग समिती अध्यक्षा सुजाता पाटेकर, स्थानिक नगरसेविका तेजस्वी घोसाळकर, विभागसंघटक सुजाता शिंगाडे, माजी नगरसेवक, मुंबै बँक संचालक अभिषेक घोसाळकर उपविभाग प्रमुख भालचंद्र म्हात्रे, विनायक समांत, शाखा प्रमुख राजेंद्र इंदुलकर जुडी मेंडोन्सा युवासेना अधिकारी जितेन परमार व शिवसैनिक उपस्थित होते.

close