shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

संतोष कदम यांची पुणे जिल्हा भाजप शिक्षक आघाडीचे अध्यक्ष पदी निवड...माजीमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते सत्कार..!!

इंदापूर ( तालुका प्रतिनिधी):
वालचंदनगर (ता. इंदापूर, पुणे )इंदापूर तालुक्यातील कुरवली येथील विद्यालयात कार्यरत असलेले शिक्षक  संतोष कदम यांची पुणे जिल्हा भाजप शिक्षक आघाडीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी पुणे जिल्हा भाजप अध्यक्ष गणेश भेगडे व पुणे जिल्हा भाजप सरचिटणीस धर्मेंद्र खांडरे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
     
इंदापूर :भाजपचे नेते तसेच महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार व संसदीय मंत्री हर्षवर्धन पाटील  शिक्षक   संतोष कदम यांचा सत्कार करतानां व इतर मान्यवर .(छाया : कैलास पवार)

यावेळी भाजपचे नेते तसेच महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार व संसदीय मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते सत्कार करून त्यांना गौरवण्यात आले. यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी त्यांना आपल्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या व शिक्षकांच्या अडीअडचणी सोडवण्यात संतोष कदम यांनी अग्रेसर असावे असे सांगण्यात आले.
यावेळी बावडा येथील विद्यालयाचे मुख्याध्यापक कोकाटे सर, कुरवली येथील विद्यालयाचे मुख्याध्यापक घोरपडे सर,बोराटवाडी येथील विद्यालयाचे मुख्याध्यापक दशरथ घोगरे सर, सहशिक्षक राजेंद्र रणमोडे, सत्यशील पाटील, हुबाले सर, विश्वजीत तावरे , वसंत जाधव, वालचंदनगर चे सरपंच विक्रम मोरे ,सुधीर पाटील तसेच इतर मान्यवर व शिक्षक स्टाफ उपस्थित होते.
--------
close