एकाच आठवडयात बीड जिल्ह्यातील दुसरी घटना..!!
बीड । जिल्हा प्रतिनिधी प्रकाश मुंडे :-
आकरा वर्षीय बालकास बिबटयाने उचलून नेत ठार मारल्याची घटना तालुक्यातील किन्ही येथे घडली असुन स्वराज्य सुनिल भापकर असे मृत बालकाचे नाव आहे.
ही घटना शुक्रवार रोजी सकाळी 12 वाजण्याच्या सुमारास उघकीस आली. ही एकाच आठवडयातील दुसरी घटना आहे.
घटनेबाबत समजलेली माहिती की, स्वराज्य भापकर हा श्रीगोंदा तालुक्यातील भापकर वाडी येथील राहणारा असुन तो दिपावळी सुट्टी साठी तालुक्यातील किन्ही येथे आपल्या आजीकडे राहण्यासाठी आला होता. नातवाईकासोबत तुरीस पाणी देण्यासाठी शेतामध्ये गेला असतांना अचानक बिबटयाने स्वराज्यवर झडप घालुन त्याचे तोंडास धरुन काही अंतरावर घेवुन जात ठार मारले आहे.
दोन दिवसापुर्वीच याच मार्गावरील किन्ही गावापासुन सात कि.मी. अंतरावर असलेल्या सुरुडी गावातील पंचायत समिती सदस्य पती यांच्यावर हल्ला करत ठार मारले आहे.
एकाच आठवडयातील ही दुसरी घटना असल्याने बिबटयाने तालुक्यात दहशत निर्माण केली असुन सर्वत्र भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने तात्काळ कारवाई करुन बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरीकांतून होत आहे.

