shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

लोणावळा उप निबंधकाला लाच घेतल्या प्रकरणी अटक..!!

पुणे:- खरेदी केलेल्या जमिनीची खरेदी नोंद लोणावळा दुय्यम निबंधक कार्यालयात करण्यासाठी तक्रारदाराकडे 30 हजार रुपयांची मागणी करत तडजोड अंती ठरलेली 25 हजार रुपयांची रोकड कार्यालयातील खाजगी इसमाच्या मार्फतीने स्विकारल्याप्रकरणी दोघांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. बुधवारी (दि.25) रोजी सायंकाळी लोणावळा दुय्यम निबंधक कार्यालयात सापळा लावत ही कारवाई करण्यात आली.

लोणावळा दुय्यम निबंधक कार्यालयातील उपनिबंधक आर.जे.भोसले व खाजगी इसम रमेश आंद्रे यांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. वाकसई देवघर ग्रामपंचायत हद्दीमधील एका जागेची खरेदी नोंद घालण्यासाठी लोणावळा उपनिबंधक हे पैशाची मागणी करत नोंद घालण्यास विलंब करत होते. यामुळे त्रासलेल्या तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधत माहिती दिल्यानंतर लाचलुचपत विभागाचे पोलीस अधिक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधिक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रकांत चौधरी, पोलीस हवालदार मुस्ताक खान, पोलीस शिपाई किरण चिमटे, माळी यांच्या पथकाने ही कारवाई केली.
close