शिर्डी । प्रतिनिधी :
कु.किरण जाधव
महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री मा.छगन भुजबळ साहेब व कोपरगाव मतदार संघाचे लोकप्रिय आमदार आशुतोष काळे गोदावरी कालव्याच्या मिटिंग संदर्भात राहाता या ठिकाणी आले असता त्यांनी मिटिंग ला जाण्यापूर्वी शिर्डी येथे भाग्यलक्ष्मी हॉटेल ला येऊन कार्यकर्त्यांची भेट घेतली व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी त्यांचा शिर्डी व राहाता परिसरातील कार्यकर्त्या तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच यावेळी आमदार आशुतोष दादा काळे यांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेश सचिव निलेश कोते रमेश गोंदकर दीपक गोंदकर संदीप सोनवणे नितीन जगताप राहुल जगताप अजित जगताप अक्षय गोर्डे विश्वदिप पिंगळे मंगेश कुलकर्णी प्रताप निर्मळ वैभव चौधरी आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

