संगमनेर । प्रतिनिधी (ऋषीकेश जगताप):
२३ नोव्हेंबर पासून शाळा उघडणार आहे. शाळा उघडण्याची जी काही प्रक्रिया आहे ती आता नियमानुसार पुर्ण झाली आहे. शाळा वर्ग व बसण्याची बाकं हे सर्व सॅनीटाईज करण्यात आले आहे. अन्य गोष्टी ज्या आहेत त्याविषयी आता शिक्षकांनाही प्रशासनाने माहिती कळवली आहे. शाळा सुरु होण्याविषयी शिक्षकांना जी माहीली मिळाली आहे. त्याविषयी पत्रकारांशी संवाद साधून ही सर्व माहिती कळवली आहे.
सॅनेटाइज असो किंवा शाळेची साफसफाई इ.कामे आवरली आहेत. तब्बल आठ महिन्याच्या दिर्घ विश्रांतीनंतर पठार भागातील शाळा उघडणार आहेत...त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
शाळा उघडणार आहे ही एक चांगली बाब आहे, पण शिक्षक आपली टेस्ट करून घेत आहेत. विद्यार्थ्यांचे काय ..? एका विद्यार्थ्यांला जरी कोरोना ची लागण झाली तरी ती लागण बाकीच्या विद्यार्थ्यांना होईल असे शिक्षकांच्या मनात आहे व याच्यावर अजून सुद्धा शासनाने थोडा विचार करावा. असे पठार भागातील शिक्षकांनी पत्रकारांशी संवाद साधत सदर माहीली दिली आहे.

